KKR New Captain: कोलकात्याला मिळाला नवा कर्णधार, श्रेयस अय्यर सांभाळणार धुरा

KKR New Captain: आगामी आयपीएल 2022 (IPL 2022) चुरशीची होणार यात शंका नाही, कारण यंदा 8 जागी 10 संघ खेळणार आहेत. दरम्यान नव्या आलेल्या संघानंतर स्पर्धेत मोठे बदल झाले असून महालिलाव (IPL Mega Auction) नुकताच पार पडला. त्यामुळे सर्व संघामध्ये नवनवीन बदल झाले असून भारताचा युवा खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने विकत घेतलं. दरम्यान श्रेयसला आता कर्णधारपदही मिळालं असून नुकतंच केकेआरनं याबाबत सोशल मीडियाद्वारे माहिती दिली. 

श्रेयसला विकत घेण्यासाठी यंदा कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल 12.25 कोटींची बोली लावली. पहिल्या दिवशी ईशान किशनपूर्वी सर्वाधिक पैसे श्रेयसला विकत घेण्यासाठीच खर्च करण्यात आले होते. दरम्यान कोलकाता संघ मागील बऱ्याच काळापासून एक चांगला कर्णधार मिळालेला नाही. गौतम गंभीरनंतर कोणत्याच कर्णधाराला खास कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान यामुळे संघ यंदा एका चांगल्या कर्णधाराच्या शोधात होता, हा शोध अखेर संपला असून श्रेयस अय्यरला 12.25 कोटींना विकत घेत केकेआरने कर्णधार मिळवला.    

आतापर्यंत श्रेयसची आयपीएलमधील कामगिरी

टीम इंडियाचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये उल्लेखणीय कामगिरी केली आहे. अय्यरने आयपीएलमध्ये आतापर्यंत 16 अर्धशतकं ठोकली असून 196 चौकार आणि 88 षटकार लगावले आहेत.  श्रेयसने आयपीएलमध्ये 87 डावांत 2 हजार 375 धावा केल्या असून 96 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. 

हेही वाचा :  शुभमन गिल तुफान फॉर्मात, सलग दुसरं एकदिवसीय शतक ठोकत खास रेकॉर्डही केला नावावर

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Nitu Gangas : भारतीय बॉक्सर नीतू घंघासची सुवर्ण कामगिरी, मंगोलियाच्या खेळाडूला हरवले

Nitu Ganghas Wins Gold in Womens World Boxing Championship : भारताची आघाडीची बॉक्सर नीतू घंघास …

सिंघमच्या हस्ते शुभमन गिलला मिळाला खास पुरस्कार,अजय देवगननं व्हिडीओ ट्वीट करत लिहिलं…

Ajay Devgn Honored Shubman Gill : बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असलेल्या अजय देवगणने (Ajay Devgan) …