अमोल कोल्हे यांच्या घोडेस्वारीवर शिवाजीराव आढळराव पाटील यांचा टोला; म्हणाले “मालिकेतील घोडी…”

बैलांच्या पुढं पळायच तर घोडी माग पळत होती; शिवाजीराव आढळराव पाटलांचा टोला

अमोल कोल्हे यांची बारी म्हणजे वराती मागून घोडं अशी टीका शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे. त्यांनी केवळ नागरिकांची करमणूक झाली असून मुंबईहून आणलेली ती घोडी होती. ती शेतकऱ्यांची घोडी नव्हती असं देखील आढळराव पाटील म्हणाले आहेत. “ज्यांना बैलगाडा शर्यत माहित नाही, त्यांना वाटतं अमोल कोल्हेंनी शब्द पाळला. पण त्यांनी शब्द पाळलेला नाही. लोकांची फसवणूक केली आहे,” असा निशाण आढळराव पाटलांनी साधला आहे. 

शिवाजी आढळराव पाटील म्हणाले की, “लिंबगाव घाटात नागरिकांची करमणूक झाली. कोल्हे यांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यान जनतेला आश्वासन दिलं होतं की, बैलगाडा शर्यत ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी पहिल्या बारीसमोर हा पठ्ठया घोडीवर बसून बारी जिंकेल. पहिली बारी पुणे, नगर जिल्ह्याचा विचार करता ११ आणि १२ फेब्रुवारी या दोन्ही दिवशी मावळ आणि आंबेगाव तालुक्यात संपन्न झाल्या आहेत. त्यावेळी हा पठ्ठया कुठे होता हे माहिती नाही. ती खरी पहिली बारी होती”.  

VIDEO: अमोल कोल्हेंनी शब्द पाळला; घोडेस्वारी करत बैलजोडीसमोर बारी

पुढे ते म्हणाले की, “पहिली बारी म्हणजे काय? घाटातून सुटलेला पहिला गाडा. आज हे गृहस्थ आले १२ वाजता. तोपर्यंत १०० गाडे पळाले होते. त्यामुळे ही पहिली बारी नाही. शब्द दिला, आश्वासन दिले, नाटकातील शब्दफेकी डायलॉग आहेत. गर्दीला खेचून घेणारे हे डायलॉग आहेत. यात काही तथ्य नाही. ज्यांना बैलगाडा शर्यत माहित नाही. त्यांना वाटतं अमोल कोल्हेंनी शब्द पाळला. त्यांनी शब्द पाळलेला नाही, लोकांची फसवणूक केली आहे”.

हेही वाचा :  “अगदी काही दिवसांपूर्वी आपण मला फोन केला…,” लतादीदींच्या आठवणी शेअर करत समीर चौगुलेने वाहिली श्रद्धांजली

“घोडीवर बसणार असा शब्द दिला होता. बैलगाडाच्या पुढं पळणारी घोडी कशी असते? ती शेतकऱ्यांना माहिती आहे. बैलगाडा पुढं धावणारी घोडी ही वेगळी असते. त्यांनी आणलेली घोडी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मालिकेमधील होती. तिला स्टुडिओमधून मुंबईतून घेऊन आले होते. ती घोडी धावण्याच्या लायकीची नव्हती. घोडी आणि खासदार बैलांच्या पाठीमागे राहिले आणि बैल पुढे गेले. त्यामुळं ही बारी फसली आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

“शब्द पाळला वैगेरे हे थोतांड आहे. ही केवळ नागरिकांची फसवाफसवी आहे. त्यांनी ही नौटंकी थांबवावी. तीन वर्षे झालं लोकांची खूप करमणूक केली आहे. तीन वर्षे त्यांनी नागरिकांची निराशा केली आहे,” असं यावेळी ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “कोल्हे यांची बारी फसली असून हे वरतीमागून घोडं तशी ही बैलामागून घोडी. बैलांच्या पुढं पळायच तर घोडी माग पळत होती. मग घोडी पळवायची कशाला? शूटिंग आणि फोटोसाठी, घोडीवर बसायचं होंत का? तसं असत तर शेतकऱ्यांची घोडी आणून बसायचं होतं’.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …