Sagar Karande : ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत नाटकवाले आले धावून

Sagar Karande : कलाकार रात्रंदिवस काम करत असतात. काम करताना ते जेवणाच्या वेळा, झोप आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. विनोदवीर सागर कारंडेनेदेखील (Sagar Karande) या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता फेसबुक लाइव्ह करत त्याने त्याच्या प्रकृतीविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे. 

सागर कारंडे सध्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ हे नाटक करत आहे. 20 नोव्हेंबरला त्याच्या या नाटकाचा मुंबई मराठी साहित्य संघात प्रयोग होता. पण या नाटकाच्या प्रयोगाआधी त्याच्या छातीत दुखू लागलं. तसेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सागरच्या प्रकृतीसंदर्भात चुकीची माहिती पसरवली जाऊ लागली. आता त्याची प्रकृती सुधारली असून त्याने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती दिली आहे. 

सागर म्हणाला,”20 नोव्हेंबरला आमच्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाचा प्रयोग होता. पण प्रयोगाआधी माझ्या छातीत दुखू लागलं, चक्कर आली. त्यानंतर मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. माझ्या सर्व टेस्ट केल्या गेल्या. त्याचे रिपोर्ट नॉर्मल आले. पण डॉक्टरांनी मला प्रवास करण्यास मनाई केली. त्यामुळे आमच्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला. 

हेही वाचा :  Allu Arjun : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन बॉलिवूडमध्ये करणार धमाका

Reels

‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ हे नाटक बुक असल्याने या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात येत नव्हता. त्यामुळे ऐनवेळी सूत्रधार गोट्या सावंत यांनी ‘वासूची सासू’ या नाटकाचा प्रयोग होईल असं जाहीर केलं. त्याप्रमाणे ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाऐवजी ‘वासूची सासू’ या नाटकाचा प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळाला. त्यामुळे सागरने ‘वासूची सासू’ या नाटकाच्या टीमचे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आभार मानले. 

सागरच्या छातीत का दुखलं? 

सागर ‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘फू बाई फू’ हे छोट्या पडद्यावरील दोन्ही कार्यक्रम करत आहे. तसेच त्याचं रंगभूमीवर ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ हे नाटक सुरू आहे. रात्री शूटिंग, नाटकाचे प्रयोग, प्रवास, वेळेवर न जेवणं असं सागर आठवडाभर करत होता. पण छातीत दुखायला लागलं त्यादिवशी त्याने काही खाल्लं नव्हतं. त्यामुळे अॅसिडीटी झाली आणि अॅसिडिटी झाल्याने त्याच्या छातीत दुखायला लागलं असं डॉक्टर म्हणाले. त्याच्या सर्व टेस्ट करण्यात आल्या असून रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. 

संबंधित बातम्या

Happy Birthday Amruta Khanvilkar : नटखट नखऱ्याची नार ‘चंद्रा’; आपल्या अभिनयासोबतच नृत्यानं सर्वांना भूरळ घालणारी लावण्यवती अमृता खानविलकर!

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …