Allu Arjun : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन बॉलिवूडमध्ये करणार धमाका

Allu Arjun Sandeep Reddy Vanga Movie Announcement : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जनचा (Allu Arjun) मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. शाहरुखच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) या सिनेमात अल्लू अर्जुनची झलक दिसणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. दरम्यान त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अल्लू अर्जुनचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. तर भूषण कुमार (Bhushan Kumar) या सिनेमाची निर्मिती करणार आहे. 

धमाका करण्यासाठी त्रिकूट सज्ज!

भूषण कुमार आणि संदीप रेड्डी वांगाने नुकतीच आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. टी-सीरिजने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. भूषण कुमार, संदीप रेड्डी वांगा आणि अल्लू अर्जुन हे तिघेही एकाच सिनेमाचा भाग असल्याने या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. टी-सीरिज फिल्म प्रोडक्शन आणि भद्रकाली पिक्चर्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. 


शूटिंगला सुरुवात कधी होणार? 

संदीप रेड्डी वांगा सध्या ‘स्पिरिट’ या सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तो अल्लू अर्जुन सोबतच्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. संदीप रेड्डी वांगाच्या ‘स्पिरिट’ या सिनेमाची निर्मितीदेखील टी-सीरिज आणि भद्रकाली पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत होत आहे. या सिनेमात प्रभास मुख्य भूमिकेत आहे. 

हेही वाचा :  पंतप्रधान मोदींनी इफ्फीला दिल्या शुभेच्छा

चाहत्यांना प्रतीक्षा ‘पुष्पा 2’ची

आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी अल्लू अर्जुन ओळखला जातो. अभिनयासाठी त्याचा डान्सदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरतो. दक्षिण भारतात अल्लू अर्जुनची चांगलीच क्रेझ आहे. पण ‘पुष्पा’ या सिनेमामुळे संपूर्ण भारतात अल्लू अर्जुन लोकप्रिय झाला. त्याच्या या सिनेमाने 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. अल्लू आणि रश्मिका मंदानाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यामुळे आता चाहते ‘पुष्पा 2’ची (Pushpa 2) आतुरतेने वाट पाहत आहेत. 

संबंधित बातम्या

Pushpa 2 : पुष्पा रिटर्न्स… अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक आऊट; 500 कोटींच्या बजेटमध्ये सिनेमाची निर्मिती



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …