Rohit Sharma : इंग्लंडविरोधातल्या सेमी फायनल सामन्यापूर्वी रोहित शर्माला दुखापत, VIDEO समोर

Rohit Sharma Injured : टीम इंडियाच्या (Team India) कॅम्पमधून एक चिंता वाढविणारी बातमी आहे. क्रीडाविश्वातील माहितीनुसार, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जखमी झाला आहे. अॅडलेडमध्ये नेटवर फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली, त्यानंतर त्याला दुखापतीमुळे वेदना होत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. T20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) मध्ये इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीपूर्वी रोहितची दुखापत ही टीम इंडियासाठी एखाद्या वाईट बातमीपेक्षा कमी नाही. मात्र, ही दुखापत किती गंभीर आहे? याबाबत सध्या काही सांगता येणार नाही. टीमच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रोहित शर्माच्या दुखापतीची दखल घेतली आहे.

 

Reels

सराव करताना रोहित शर्माच्या हाताला दुखापत

भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना अॅडलेडमध्ये 10 नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यासाठी रोहित नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत होता. रोहितची दुखापत फारशी गंभीर नसावी, त्यामुळे भारताला उपांत्य फेरीत कोणताही अनुचित प्रकार सहन करावा लागू नये, अशी आशा बाळगायला हवी. आता प्रश्न असा आहे की रोहित शर्माला कोणत्या प्रकारची दुखापत झाली? त्यास कुठे दुखापत झाली? मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय कर्णधाराला फलंदाजीच्या सरावात उजव्या हाताला दुखापत झाली. या दुखापतीनंतर तो रडताना दिसला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संघाचे फिजिओ धावत धावत नेटवर गेले, त्यांना रोहित शर्माच्या दुखापतीची माहिती मिळाली.

हेही वाचा :  Optical Illusion: 'या' फोटोतील कपाटात असलेला कॉफीचा मग शोधून दाखवा

 

 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …