क्रिकेटर दानुष्का गुणथिलाकावर बलात्काराचा आरोप, सर्व क्रिकेट फॉर्मेटमधून निलंबित

Sri lanka Cricketer Danushka Gunathilaka News  : श्रीलंकेचा सलामीवीर दानुष्का गुणथिलाका (Danushka Gunthilaka) याच्यावर ऑस्ट्रेलियात बलात्काराचा आरोप झाल्यानंतर श्रीलंका क्रिकेटने कारवाई केली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित केले आहे. त्यामुळे आता बलात्कार प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचे क्रिकेट सामने खेळता येणार नाहीत.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या प्रकरणी एक निवेदन समोर आणलं आहे. त्यात म्हटले आहे की, “दानुष्का गुणथिलाका याने ऑस्ट्रेलियात एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपानंतर आणि तिच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर, श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने हा निर्णय घेतला आहे.” या निवेदनात या आरोपाची चौकशी करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट तातडीने आवश्यक पावले उचलेल आणि ऑस्ट्रेलियन न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणात खेळाडू दोषी आढळल्यास त्याला शिक्षाही केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

सिडनी पोलिसांनी रविवारी पहाटे श्रीलंकेचा सलामीवीर दानुष्का गुणथिलाकाला अटक केली. एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर सिडनी पोलिसांनी श्रीलंका टीम थांबलेल्या हॉटेलमधून दानुष्काला अटक केली होती. सध्या दानुष्का सिडनीत असून श्रीलंकेचा उर्वरित संघ कोलंबोला परतला आहे. दरम्यान न्यू साउथ वेल्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एका ऑनलाइन डेटिंग अॅपद्वारे अनेक दिवसांच्या चॅटिंगनंतर दोघांची भेट झाली. 2 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी दानुष्काने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. ही घटना ‘रोझ बे’ या महिलेच्या निवासस्थानीच घडली. क्राईम सीनची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी 31 वर्षीय दानुष्काला सिडनीतील ससेक्स स्ट्रीटवरील हॉटेलमधून अटक केली, अशीही माहिती समोर आली आहे.

हेही वाचा :  बीसीसीआयकडून अध्यक्षांसह संपूर्ण निवड समितीच बरखास्त; 5 मोठे कारण समोर

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …