ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच दिव्या अग्रवाल पापाराझींसमोर! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Divya Agarwal : ‘बिग बॉस ओटीटी’ विजेती दिव्या अग्रवालने (Divya Agarwal) हिने अभिनेता वरुण सूदसोबत ब्रेकअप करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक लांब पोस्ट लिहिली, ज्यामध्ये तिने तिचा प्रियकर वरुण सूदसोबत ब्रेकअपची जाहीर घोषणा केली. त्यांच्या ब्रेकअपची बातमी समजल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या दोघांचे वेगळे होणे चाहत्यांसाठी पूर्णपणे अनपेक्षित होते, कारण ही जोडी जवळपास चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होती.

वरुणसोबतच्या तिच्या ब्रेकअपचे कारण सांगताना, मॉडेल आणि अभिनेत्री दिव्या अग्रवालने लिहिले की, ‘वेगळे होण्याचा त्यांचा निर्णय तिची निवड होती आणि वरुण नेहमीच तिचा चांगला मित्र असेल.’ यानंतर दिव्या आणि वरुण सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले. त्याचवेळी अनेकांनी या ब्रेकअपसाठी वरुणला दोषी म्हटले आहे. हे सगळं पाहून दिव्याला थांबता आलं नाही आणि तिने लगेच ट्रोल करणाऱ्यांना सुनावले.

ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच स्पॉट झाली दिव्या!

आता ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाली. प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दिव्या अग्रवाल स्पॉट झाली आहे. या व्हिडीओमध्ये, दिव्या टोन्ड जीन्स आणि स्लीव्हलेस टी-शर्टमध्ये दिसली होती आणि उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी टिंटेड सनग्लासेस परिधान केले होते. कॅज्युअल लूकमध्येही दिव्या सुंदर दिसली.

हेही वाचा :  या कलाकारांच्या निधनानं पोरकी झाली चित्रपटसृष्टी

पाहा व्हिडीओ :

यादरम्यान पापाराझींनी तिची विचारपूस केली. व्हिडीओमध्ये फोटोग्राफर ‘कशी आहेस… खंबीर रहा’ असे म्हणताना ऐकू येत आहे. यावेळी दिव्या मात्र हसताना दिसली आणि तिने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे खास आनंदी शैलीत दिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिझन्सही या व्हिडीओवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. मात्र, काही लोकांनी तिच्या याच वागणुकीमुळे तिला ट्रोल देखील केले आहे. नेटकऱ्यांच्या मते, ब्रेकअपनंतर अभिनेत्रीचे असे हसून मीडियाशी बोलणे योग्य नाही. यामुळेच त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …