अमिताभ बच्चन यांनी घेतली फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो अन् मेस्सीची भेट

Amitabh Bachchan Video:  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. सध्या बिग बी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. अमिताभ बच्चन यांनी रियाध एसटी इलेव्हन (Riyadh Eleven) आणि पॅरिस सेंट जर्मन (PSG) यांच्यात झालेल्या फुटबॉल सामन्याला पाहुणे म्हणून हजेरी लावली. यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि लियोनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्याची भेट घेतली. त्यानंतर बिग बींनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) शेअर केला. 

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन सौदीतील किंग फहद इंटरनॅशनल स्टेडियममध्ये दिसत आहेत. यादरम्यान अमिताभ यांनी रियाद एसटी-11 आणि पीएसजी फुटबॉल टीमच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. यावेळी बिग बींनी फुटबॉलस्टार लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत बातचीत केली.

अमिताभ बच्चन यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं, ‘रियाधमधली एक संध्याकाळ… क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, एमबापे, नेमार सर्व एकत्र खेळत आहेत. PSG विरुद्ध रियाध सीझन्स.. अविश्वसनीय‘ अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  या व्हिडीओला विराट कोहली, अरमान मलिक, संजय कपूर यांनी कमेंट्स केल्या आहेत. 

हेही वाचा :  Happy Birthday Alka Yagnik : गायिका अलका याज्ञिक लग्न होऊनही पतीपासून 27 वर्षे दूर, 'हे' आहे का

news reels New Reels

पाहा व्हिडीओ: 


बिग बी प्रभासच्या नव्या प्रोजेक्टमध्ये काम करणार

केबीसीसारख्या कार्यक्रमांसोबतच बिग बी हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. काही दिवसांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले. तसेच अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच अनुपम खेर, बोमन ईरानी, नीना गुप्ता, सारिका, परिणीती आणि डॅनी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. आता बिग बी हे प्रभासच्या नव्या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आागमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Jaya Bachchan: ‘अशा लोकांना नोकरीवरुन काढून टाकलं पाहिजे’; फोटोग्राफरवर पुन्हा भडकल्या जया बच्चन



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …