अभिषेकच्या उत्तरानं जिंकली अनेकांची मनं!

Abhishek Bachchan On Taslima Nasrin: बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असणारे अमिताभ  बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. तसेच मनेरंजन सृष्टीमध्ये त्यांनी विशेष स्थान निर्माण केलं आहे. अमिताभ  यांचा मुलगा अभिषेक (Abhishek Bachchan) हा देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. प्रसिद्ध लेखिका तस्लीम नसरीन (Taslima Nasrin) यांनी नुकतेच बिग बी आणि अभिषेक यांच्याबद्दल एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं. पण त्यांच्या ट्वीटला अभिषेकनं दिलेल्या उत्तरानं अनेकांची मनं जिंकली आहेत.  

तस्लीम नसरीन यांचे ट्वीट
तस्लीम नसरीन यांनी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं,  ‘अमिताभ बच्चन हे त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनवर इतकं प्रेम करतात की त्यांना वाटतं की त्यांच्या मुलाला त्यांच्यामध्ये असणाऱ्या सर्व कौशल्यांचा वारसा मिळाला आहे. तसेच त्यांना वाटतं की, त्यांचा मुलगा सर्वोत्तम आहे. अभिषेक चांगला आहे, पण मला अभिषेक हा अमिताभ बच्चन यांच्या एवढा टॅलेंटेड वाटत नाही.’  तस्लीम यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. पण नंतर हे ट्वीट तस्लीम यांनी डिलीट केले. 

हेही वाचा :  Bhargavi Chirmuley : भार्गवीचं 'येतोय तो खातोय' नाटक प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

अभिषेकचा रिप्लाय 
अभिषेकनं तस्लीम नसरीन यांच्या ट्वीटला रिप्लाय दिला, ‘अगदी बरोबर, मॅडम. टॅलेंट किंवा इतर कोणत्याही गोष्टीबाबत माझी आणि त्यांची तुलना होऊच शकत नाही ते नेहमीच “सर्वोत्तम” राहणार आहेत. मला माझ्या वडिलांचा अभिमानी वाटतो.’ अभिषेकनं दिलेल्या या रिप्लायचं सध्या सोशल मीडियावर अनेक नेटकरी कौतुक करत आहेत.

News Reels

अभिषेकच्या या ट्वीटला अभिनेता सुनिल शेट्टीनं देखील रिप्लाय दिला आहे. 

 अभिषेकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्याच्या बॉब बिस्वास, लुडो,मनमर्जिया, हॅप्पी न्यू इअर, दोस्ताना आणि दिल्ली-6 या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Abhishek Bachchan: ‘बेरोजगार’ म्हणणाऱ्या ट्रोलरला अभिषेकनं दिलं सडेतोड उत्तर; ट्वीटनं वेधलं लक्षSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …