परवानगी न घेता फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर नीना गुप्ता भडकल्या, व्हिडीओ व्हायरल

Neena Gupta: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  नीना गुप्ता (Neena Gupta) या वेगवेगळ्या वेब सीरिजमधून आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नीना या सोशल मीडियावर सक्रिय असतात. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करतात. नुकताच नीना यांनी सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर भडकल्या नीना गुप्ता 

नीना गुप्ता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.  व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  त्या मुंबईमधील नेहरु सेंटरमधील आर्ट फेस्टिव्हलमध्ये फिरत आहेत. यावेळी एक व्यक्ती नीना गुप्ता यांची परवानगी न घेता त्यांचा फोटो काढतो. ते पाहून नीना गुप्ता या म्हणतात, ‘लोक माझी परवानगी न घेता माझे फोटो काढतात. मी तर मी तर पब्लिक प्रॉपर्टी आहे ना, जाऊ देत.’ नीना यांच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले. 

नीना यांच्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. तर पाच हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. 

हेही वाचा :  Bawaal : वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा 'बवाल' लवकरच होणार प्रदर्शित

पाहा व्हिडीओ: 

news reels New Reels


नीना गुप्ता यांनी हिट चित्रपटांमध्ये केलं काम

बधाई दो, शुभमंगलम सावधान, गुड बाय आणि ऊंचाई या हिट चित्रपटांमध्ये नीना गुप्ता यांनी काम केलं. तसेच त्यांनी पंचायत, मसाबा मसाबा आणि पंचायत 2 या ओटीटीवरील वेब सीरिजमध्ये देखील प्रमुख भूमिका साकारली. पंचायत वेब सीरिजमध्ये त्यांनी साकारलेल्या मंजू देवी या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं.

‘वध’ ला मिळाली प्रेक्षकांची पसंती 

9 डिसेंबरला नीना गुप्ता यांचा वध हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात नीना गुप्ता यांच्यासोबतच संजय मिश्रा यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. . राजीव बर्नवाल आणि जसपाल सिंह संधूने या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. नीना यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Satish Kaushik : गरोदर नीना गुप्ता यांना सतीश कौशिक यांनी घातली होती लग्नाची मागणी; जाणून घ्या नेमकं काय घडलेलं?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …