Kaun Banega Crorepati : बिग बींनी जया बच्चन यांच्या सोबत लग्न का केलं?

Kaun Banega Crorepati 14 Promo : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. अमिताभ आणि जया बच्चन (Jaya Bachchan) ही बॉलिवूडची परफेक्ट जोडी आहे. आता ‘कौन बनेगा करोडपती 14’च्या (Kaun Banega Crorepati 14) मंचावर अमिताभ यांनी जया बच्चन यांच्याशी लग्न करण्याचं कारण सांगितलं आहे. 

अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती 14’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहेत. नुकत्याच या कार्यक्रमाचा एक प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करताना दिसत आहेत. तसेच हॉटसीटवर बसलेली स्पर्धक प्रियांकाचं तिच्या केसांवरुन कौतुक करताना दिसत आहे. 

प्रियांकाचे लांबलचक केस पाहिल्यानंतर बिग बी जुन्या आठवणीत रमले आणि त्यांनी जया बच्चन यांच्यासोबत लग्न करण्याचं कारण सांगितलं. अमिताभ बच्चन म्हणाले,”जयाचे केस लांबलचक असण्याने मी तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला”. बिग बींच्या उत्तराने चाहते खूश झाले. 


जया बच्चन आणि अमिताभ बच्चन ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी आहे. अमिताभ आणि जया 3 जून 1973 रोजी लग्नबंधनात अडकले. आता पुढल्या वर्षी अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण होणार आहेत. आता संसाराच्या 50 वर्षानंतर अमिताभ यांनी जया बच्चन यांच्यासोबत लग्न केल्याचं कारण सांगितलं आहे. 

हेही वाचा :  मनोज तिवारी तिसऱ्यांदा होणार बाबा, पत्नीच्या बेबी शॉवरचा व्हिडीओ केला शेअर

अनेक दशकं गाजवलेले अमिताभ बच्चन आजही वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यांचा ‘ऊंचाई’ हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमात अमिताभ यांच्यासह अनुपम खेर, बोमन ईरानी, नीना गुप्ता, सारिका, परिणीती आणि डॅनी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

संबंधित बातम्या

Amitabh Bachchan: केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना दुखापत, पायाला टाके; चाहत्यांना दिली माहितीSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …