एमसी स्क्वेअरला विराट कोहलीनं केला खास मेसेज; म्हणाला…

MC Square Got Praise From Virat Kohli: छोट्या पडद्यावरील  हसल 2.0 (Hustle 2.0) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकताच या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडला.  हसल 2.0 या कार्यक्रमाचा एमसी स्क्वेअर (MC Square) हा स्पर्धक विजेता ठरला आहे. सोशल मीडियावर अनेक जण एमसी स्क्वेअरला शुभेच्छा देत आहेत. नुकताच एमसी स्क्वेअरला  क्रिकेटपटू विराट कोहलीनं (Virat Kohli) एक खास मेसेज केला. मेसेज करुन विटारनं एमसी स्क्वेअरचं कौतुक केलं आहे. 

हैदराबाद येथे राहणाऱ्या एमसी स्क्वेअरला हसल 2.0 या कार्यक्रमामधून विशेष लोकप्रियता मिळाली. त्याच्या रॅपला प्रेक्षकांची पसंती मिळत होती. एका मुलाखती दरम्यान एमसी स्क्वेअरनं विराट कोहलीनं त्याला केलेल्या मेसेजबाबत सांगितलं. त्यानं सांगितलं की विराटनं त्याला इन्स्टाग्रामवर मेसेज केला. तसेच विराटनं त्याला इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यास देखील सुरुवात केली. 

विराटचा खास मेसेज 
विराटनं एमसी स्क्वेअरला केलेल्या मेसेजमध्ये लिहिलं, ‘भाईसाहाब, तू कमाल आहेस, वा!’ या मेसेजला एमसी स्क्वेअरनं रिप्लाय दिला, ‘धन्यवाद भैय्या, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे.’ एमसी स्क्वेअरच्या या मेसेजला विराटनं रिप्लाय दिला, ‘आनंदी राहा. काम करत राहा. नैना की तलवार हा रॅप मी कमीत कमी 100 वेळा ऐकला. कमाल…’ 

हेही वाचा :  नाव न घेता चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल

एमसी स्क्वेअर याचं खरं नाव अभिषेक बैसला हे आहे. तो हसल 2.0 या कार्यक्रमाचा विजेता ठरला आहे. एमसी स्क्वेअरला हसल 2.0 हा कार्यक्रम जिंकल्यानंतर ट्रॉफी आणि दहा लाख रुपये मिळाले. काल (6 नोव्हेंबर) या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडला होता. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Indian Idol 13: इंडियन आयडॉलमधील या स्पर्धकाचा फॅन झाला विराट कोहली; केला खास मेसेज



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …