माधुरी दीक्षितनं ‘मेरा दिल ये पुकारे’ गाण्यावरील डान्सचा ट्रेंड फॉलो केल्यानं नेटकरी संतापले

Madhuri Dixit: पाकिस्तानमधील आयेशा नावाच्या तरुणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आयेशा ही लता मंगेशकर यांच्या ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ या गाण्यावर डान्स करत आहे. आयेशाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ डान्स करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला. या ट्रेंडला अनेक नेटकऱ्यांनी तसेच सेलिब्रिटींनी फॉलो केलं. आता हा ट्रेंड बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितनं (Madhuri Dixit) देखील फॉलो केला आहे. माधुरीनं ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला कमेंट करत अनेक नेटकरी माधुरीला ट्रोल करत आहेत. 

माधुरीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती सिल्वर नेटेड साडी आणि सिल्वर ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी माधुरीच्या डान्सचं कौतुक केलं पण काहींनी मात्र तिला ट्रोल केलं. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स 
माधुरीच्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘या ट्रेंडचा व्हायरस भारतात देखील आला.’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘ओह नो, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती’. ‘तुम्ही माझ्या फेवरेट आहात. प्लिज असला थर्ड क्लास ट्रेंड फॉलो करु नका’, अशी देखील कमेंट एका नेटकऱ्यानं केली.

हेही वाचा :  Viral Video : तुरुंगातील 40 फूट भिंतीवरून मारली उडी अन् कैद्याने लंगडत लंगडत ठोकली धूम; घटना CCTV मध्ये कैद!

पाहा व्हिडीओ: 

News Reels


काही महिन्यांपूर्वी ”द फेम गेम’ ही माधुरीची सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली. या सीरिजमध्ये माधुरीसोबत  संजय कपूर, मानव कौल, सुहासिनी मुले, लक्ष्यवीर सरन या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. माधुरी ही झलक दिखला जा या कार्यक्रमामधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येत होती. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Madhuri Dixit:  मुंबईच्या लोअर परेल भागात ‘धक धक गर्ल’ माधुरीनं घेतलं आलिशान घर; किंमत पाहून व्हाल अवाक्!Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …