’75 हार्ड चॅलेंज’ म्हणजे काय रे भाऊ? सोशल मीडियावर का होतंय ट्रेंड?

What is 75 hard challenge?… सोशल मीडियावर एखादा ट्रेंड ( special media trend ) सुरू झाला की सर्वत्र व्हायरल होत असतो. एखादं गाणं असो वा एखादा व्हिडीओ… सगळं काही सेकंदात इकडंच्या तिकडं करण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. सुरुवातीला काळात टाईमपास म्हणून सोशल मीडियाचा (social media) वापर केला जात होता. मात्र, आता पैसे कमवण्याचं नवमाध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पाहिलं जातंय. अनेक नवनवीन संकल्पना, प्रयोग हल्ली समाज माध्यमावर ट्रेंड होत असतात. अशातच आता गेल्या महिन्याभरात ’75 हार्ड चॅलेंज’ ही संकल्पना रुजली आहे. ही संकल्पना नेमकी आहे तरी काय? यात काय काय करतात? जाणून घ्या सविस्तर…

 ’75 हार्ड चॅलेंज’ आहे तरी काय?

एखाद्या व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक दृष्टीने मजबुत करण्यासाठी एक प्रयोग करण्यात आला. उद्योजक अँडी फ्रायसेला यांच्या संकल्पनेतून काहीजणांनी हा प्रयोग करून पाहिला. याचे सकारात्मक परिणाम दिसून आल्यावर अनेकांनी याचं अनुकरण केलं. त्यानंतर भारतासह अनेक देशात यावर सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. यात नेमकं काय काय असतं पाहूया…

आहार (Diet) – यामध्ये तुम्हाला 75 दिवस योग्य आहार घ्यावा लागतो. संतुलित आणि स्वच्छ आहाराचा समावेश करावा. बाहेरील पदार्थ खाण्यास बंदी… पिझ्झा, बर्गर वैगेरे काहीच नाही. व्यसनावर देखील नियंत्रण ठेवावं लागतं. तसेच दररोज कमीतकमी 3.8 लीटर पाणी प्यावं लागतं. 

हेही वाचा :  "मोदींना मारायला तयार व्हा"; कॉंग्रेस नेत्याचे कार्यकर्त्यांसमोर वादग्रस्त वक्तव्य

व्यायाम (Exercise) – तुम्हाला या 75 दिवसात दररोज दोन वेळा म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी 45-45 व्यायाम करावा लागतो. तुम्हाला जिम करायची असेल तर जिम. योगा असेल तर योगा.. तुमच्या आवडीचा व्यायाम प्रकार तुम्ही करू शकता. मात्र, नियमित न चुकता व्यायाम हवाच.

निसर्गाच्या सानिध्यात (Outdoors Activity) – तुम्ही दररोज करत असलेला 45 – 45 मिनिटांचा एक व्यायाम निसर्गाच्या सानिध्यात असायला हवा. ज्यामुळे तुम्ही वातावरणाशी जोडले जाल.

वाचन (Reading) – स्वतःच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होईल असं एखादं पुस्तक तुम्ही दररोज वाचलं पाहिजे. यासाठी वेळेची मर्यादा नाही. मात्र, तुम्ही दररोज 10 पानं वाचायला हवी.

एक फोटो (Progress Photo) – दररोज व्यायाम करून झाल्यावर तुम्ही तुमचा एक फोटो काढा, ज्यामुळे तुम्हाला दररोज किती फरक पडला याचा अंदाज येईल.

नवीन शिका (Learn more, No Cheat) – दररोज तुम्ही काहीतरी नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे कटू अनुभवांना सामोरं जावं लागणार नाही. या 75 दिवसात चुका टाळण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मानसिक क्षमता वाढेल.

दरम्यान, नियमितपणे हा प्रयोग केल्याने तुम्हाला शारीरिक तसेच मानसिक ताकद वाढल्याचं जाणवेल. मात्र एक दिवस जरी चूक झाली तर, हा प्रयोग पुन्हा पहिल्यापासून सुरू करावा लागतो. त्यामुळे इथे चुकीला माफी नाही.

हेही वाचा :  कर्नाटकात आज सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी, यांची खास उपस्थितीत



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …