“मोदींना मारायला तयार व्हा”; कॉंग्रेस नेत्याचे कार्यकर्त्यांसमोर वादग्रस्त वक्तव्य

PM Modi : मध्य प्रदेशचे माजी मंत्री आणि कॉंग्रेस नेते राजा पटेरिया (Raja Pateria) यांनी पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राजा पटेरिया यांनी कॉंग्रेस (Congress) कार्यकर्त्यांना पंतप्रधान मोदी यांच्या हत्येसाठी तयार व्हा अशी सूचना केली. संविधान वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या हत्येसाठी तयार राहा, असे या कॉंग्रेस नेत्याने म्हटले आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॉंग्रेस नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

राजकारणात बदला घेण्याची भावना

पन्ना येथील काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी मंत्री राजा पटेरिया म्हणाले की, “देशाचे संविधान वाचवायचे असेल आणि आदिवासींचे रक्षण करायचे असेल तर मोदींना मारायला तयार व्हा. आपल्या देशाच्या राजकारणात आता सौहार्द आणि बंधुभावाचा संबंध राहिलेला नाही. आता राजकारणात बदला घेण्याची भावना उघडपणे दिसू लागली आहे. राजकीय भाषेची पातळी सातत्याने घसरत आहे.”

कॉंग्रेसचे स्पष्टीकरण

“राजा पटेरिया यांचे विधान नीट ऐका, त्यांना मारून नव्हे तर निवडणुकीच्या वेळी त्यांचा पराभव करून संविधान वाचवण्याविषयी बोलत होते. भाजपचे अनेक नेते, माध्यमे खोटी माहिती पसरवत आहेत,” असे मध्य प्रदेश कॉंग्रेस सेवादलाने म्हटले आहे. यासोबत त्यांनी एक व्हिडीओसुद्धा ट्विट केला आहे.

हेही वाचा :  पतीने पत्नीच्या हत्येसाठी दिली 6 लाखांची सुपारी, पण शुटर्सने पतीलाच गोळ्या घातल्या; कारण ऐकून पोलीसही चक्रावले

काय आहे व्हिडीओमध्ये?

“मोदी निवडणुका संपवून टाकतील. मोदी धर्म, भाषा आणि जातीच्या आधारावर विभाजन करतील. अल्पसंख्यांकांचे जीव धोक्यात आहे. संविधान वाचावायचे असेल तर मोदींची हत्या करायला तयार राहा. हत्या म्हणजे हरवण्याचे काम,” असे राजा पटेरिया या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.

माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला – राजा पटेरिया

राजा पटेरिया युद्धाबाबत बोलून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पटेरिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर काँग्रेस नेत्याने आता स्पष्टकरीण दिले आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय. मी मोदींचा पराभव करण्याबाबत बोलत होतो असे पटेरिया यांनी म्हटले आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतात लवकरच आपोआप दुरुस्त होणारे रस्ते? NHAI ने सुरु केलं काम; खड्ड्यांची समस्या कायमची संपणार

Self Healing National Highways In India: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वाखालील रस्ते वाहतूक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या …

Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashatra Weather News : राज्यात सध्या हवामानाच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती पाहायला मिळत आहे. तिथं …