अखेर ज्याची भीती तेच होतंय! राज्यात डेल्टाक्रॉन वेरिएंटचा शिरकाव? WHO चा गंभीर इशारा

मुंबई : भारतातही कोरोनाचा हायब्रिड वेरियंट आढळला आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टापासून या वेरियंटची निर्मिती झाली असून डेल्टाक्रॉन असं या नव्या वेरियंटचं नाव आहे. चिंतेची बाब म्हणजे हा वेरियंट वेगानं पसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सायप्रसमधील शास्त्रज्ञानी सर्वात प्रथम या वेरियंटचा शोध लावला असून त्याला सूपर म्युटंट वेरियंटमध्ये टाकण्यात आलंय. ब्रिटनमध्ये या वेरियंटचे रुग्ण आढळून आले होते.

भारतातील कोरोना व्हायरसच्या नवीन रुग्णांमध्ये घट होत असल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र पुन्हा कोविड-19 च्या नवीन प्रकाराने देशात शिरकाव केला आहे. कोरोना विषाणूचा नवीन प्रकार डेल्टा  आणि ओमिक्रॉन वेरियंट मिश्रणातून बनलेले आहे. डेल्टा आणि ओमिक्रॉनचा बनलेला ‘डेल्टाक्रॉन’ विषाणू भारतात पोहोचला आहे आणि अनेक राज्यांमध्ये प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

देशातील या राज्यांमध्ये डेल्टाक्रॉनचा शिरकाव? 

मनी कंट्रोलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, भारताच्या कोविड जेनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) आणि GSAID ने सूचित केले आहे की, देशात 568 रुग्णांमधील संसर्गाची तपासणी सुरू आहे. पूर्वी हॉटस्पॉट बनलेल्या कर्नाटकातील 221 प्रकरणांमध्ये डेल्टाक्रॉन वेरियंट संशयित मिळाले आहेत. यानंतर तामिळनाडूमध्ये 90, महाराष्ट्रात 66, गुजरातमध्ये 33, पश्चिम बंगालमध्ये 32 आणि तेलंगणात 25 आणि नवी दिल्लीत 20 प्रकरणे तपासली जात आहेत.

हेही वाचा :  2023 च्या परिक्षेत 2019चा पेपर जसाच्या तसा? फेलोशिपच्या पेपरफुटी प्रकरणाबाबत मोठी अपडेट

डेल्टाक्रॉन हा डेल्टा आणि ओमिक्रॉनचा संकरित प्रकार

तज्ज्ञांच्या मते, हा एक सुपर सुपर-म्युटंट व्हायरस आहे. ज्याचे वैज्ञानिक नाव BA.1 + B.1.617.2 आहे. तज्ञांनी सांगितले आहे की डेल्टा आणि ओमिक्रॉनचा बनलेला एक संकरित स्ट्रेन आहे.  

गेल्या महिन्यात सायप्रसमधील संशोधकांनी पहिल्यांदा हा स्ट्रेन शोधला होता. त्यावेळी शास्त्रज्ञांनी ही प्रयोगशाळेतील तांत्रिक चूक असल्याचे मानले. पण आता ब्रिटनमध्ये प्रकरणे समोर येत आहेत. 

कोविडच्या नवीन प्रकारांमुळे संसर्ग…

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की डेल्टा आणि ओमिक्रॉनचा बनलेला नवीन विषाणू किती धोकादायक आहे. याबद्दल अनेक अभ्यास सुरू आहेत. अहवालानुसार, या विषाणूचा प्रादुर्भाव फ्रान्समध्ये जानेवारी 2022 मध्ये आढळून आला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)ने हा संकरित विषाणू वेगाने पसरू शकतो असे म्हटले आहे.

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं ‘जय श्री राम’, शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटीतल्या उत्तर पत्रिका तपासणीतल्या …