Breaking News
  • Bus Accident : तामिळनाडूमध्ये भीषण अपघात! प्रवासी बस 100 फूट दरी कोसळून 9 जणांचा मृत्यू
  • आजपासून नवा बदल! जन्माचा दाखला आजपासून देशभरात महत्त्वाचा पुरावा
  • Amazon Great Indian Festival 2023 सेल या दिवसापासून होणार सुरू, यावर भरघोस ऑफर्स
  • Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस, असा असेल परतीचा पाऊस
  • “शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरलीच नाहीत, मग…”, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत!

Viral Video: हुंड्यात सासरच्यांनी दिली होती ट्रेनची ऑफर; पण वराने नकार देण्याचं कारण ऐकून पोट धरून हसाल


सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ पाहून डोक्यावर हात मारण्याची वेळ येते. तर काही व्हिडीओ पाहिल्यानंतर पोट धरून हसावं लागतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर खोटं बोलण्याच्या काही मर्यादा असतात की नाही, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. व्यक्तीचे हावभाव पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडीओतील व्यक्ती हुंड्यात सासरचे चक्क ट्रेन देणार होते, अशी बढाई मारताना दिसत आहे. नकार दिल्याचे कारण ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल.

व्हिडीओतील व्यक्ती सांगत आहे की, ‘त्याच्या सासरच्या लोकांनी त्याला हुंड्यात ट्रेन देऊ केली होती. ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे.’ त्यानंतर त्याला विचारलं की, त्याने ती घेण्यास नकार का दिला? तेव्हा तो म्हणला “मला ट्रेन कशी चालवायची हे माहित नव्हते, म्हणून मी नकार दिला. याशिवाय घरी ट्रेन उभी करण्यासाठी जागा नसल्यामुळे ट्रेन नेण्यास नकार दिला.”

View this post on Instagram

A post shared by memes | comedy (@ghantaa)

नेटकरी असे मजेदार व्हिडीओ डोक्यावर घेतात. हा मजेदार व्हिडीओ युजर्स वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. एका युजरने लिहीलं आहे की, “खोटं बोलायची पण हद्द असते राव, ट्रेन काय रस्त्यावर चालवणार होता का?”. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, “मला तर हुंड्यात रॉकेट मिळणार होतं. पण बाइकवर फिरण्याची मजा काही वेगळीच आहे.”

The post Viral Video: हुंड्यात सासरच्यांनी दिली होती ट्रेनची ऑफर; पण वराने नकार देण्याचं कारण ऐकून पोट धरून हसाल appeared first on Loksatta.



Source link

हेही वाचा :  गावकऱ्यांच्या डोक्याचा ताप वाढला... चोरट्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये घातला दरोडा...

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …