Viral Video: अभ्यास करताना विद्यार्थ्याची जीभ घसरली! वाचता वाचता मध्येच म्हणू लागला ‘कच्चा बादाम’


सोशल मीडिया म्हंटलं की व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ. रोज या ना त्या कारणाने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडिया असं व्यासपीठ आहे की, रातोरात एखादी व्यक्ती स्टार बनते. त्यामुळे कोण कधी स्टार होईल सांगता येत नाही. तर काही व्हिडीओ इतके व्हायरल होतात की महिनोंमहिने त्याची चर्चा होत असते. सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या पुष्पा चित्रपटातील गाणी आणि डायलॉग व्यतिरिक्त ‘कच्चा बादाम’ गाणं ट्रेंड होत आहे. या गाण्यावर लोकं रिल्स, मीम्स तयार करताना दिसत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर तासतास घालवणाऱ्या व्यक्तींच्या तोंडावर कच्चा बादाम हे गाणं गेल्या काही दिवसापासून आपसूक येत आहे. एखाद्याने गाणं सुरू करावं आणि दुसऱ्यानं पुढे गात जावं असं हल्ली पाहायला मिळतं.

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक विद्यार्थी अभ्यास करताना या व्हिडीओत दिसत आहे, सुरुवातीला व्यवस्थितरित्या वाचणारा विद्यार्थी अचानक कच्चा बादाम गाणं गाऊ लागतो. त्यानंतर त्यालाच कळत नाही नेमकं काय झालं आहे. पुस्तकं फेकून काय होतंय अशी त्याची प्रतिक्रिया व्हिडीओत दिसते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हेही वाचा :  मुंबईच्या रस्त्यांवर अभिनेत्री दिसली बाईक चालवताना, सिग्नलला लोकांनी ओळखलं अन्…

यूजर्स वेगवेगळ्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल करत आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच मजेशीर कमेंट्स करत आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

The post Viral Video: अभ्यास करताना विद्यार्थ्याची जीभ घसरली! वाचता वाचता मध्येच म्हणू लागला ‘कच्चा बादाम’ appeared first on Loksatta.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …