‘त्या’ प्रियकराचा मृत्यू, ‘व्हॅलेंटाईन डे’ ठरला अखेरचा दिवस

मुंबई : एकेकाळी एकमेकांवर अतोनात प्रेम केलं. पण प्रेमात आलेला दुरावा इतका विकोपाचा ठरला की एकमेकांच्या जीवावर उटले. तीन वर्षे एकमेकांचं मन जपलं. पण प्रेमाचं रुपांतर लग्नात होऊ शकलं नाही म्हणून प्रियकराने प्रियसीला मनस्ताप द्यायला सुरूवात केली. आणि इथूनच त्यांच्या प्रेमात कटूता आली… या संपूर्ण प्रकाराचा शेवट अंगावर काटा आणणारा आहे. 

नाशिकच्या देवळ्यात प्रेयसीनं जाळलेल्या प्रियकराचा व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच मृत्यू झाला आहे. सारं काही कशासाठी तर प्रेमासाठी… लग्न मोडल्याच्या रागातून प्रेयसीनं कुटुंबियांच्या मदतीने टोकाचा पाऊल उचललं. 

नेमकी घटना काय?

देवळा तालुक्यातल्या लोहणेर गावात राहणाऱ्या गोरख बच्छाव या तरुणाचं मालेगावजवळच्या रावळगाव इथं राहणाऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघंही एकाच समाजतले आणि जवळचे नातेवाईक होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते, आणि त्यांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता.

पण मुलीच्या कुटुंबियांच्या कानावर ही गोष्ट गेली, त्यांनी या लग्नाला विरोध केला आणि मुलीचं दुसरीकडे लग्न ठरवलं. या गोष्टीने दुखावलेल्या गोरख बच्छावने मुलीच्या होणाऱ्या नवऱ्या मुलाला प्रेमसंबंधांची माहिती दिली. आपले आणि मुलीचे प्रेमसंबंध असून तिच्याशी लग्न करायचं असल्याचं त्याने सांगितले. यानंतर होणाऱ्या नवऱ्या मुलाने लग्न मोडलं.

हेही वाचा :  VIDEO: दर्शना पवारच्या हत्येआधीचे CCTV फुटेज समोर; राहुलच्या मनात खदखदत होता 'तो' राग

मुलीचं लग्न मोडल्याने तिच्या घरचे चांगलेच संतापले. त्यांनी मुलाचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक म्हणजे ती मुलगीही घरच्यांचा कटात सामील झाली. बदला घेण्याच्या भावनेने मुलगी आणि तिचं कुटुंब पेटून उठलं. 

त्यांनी गोरख बच्छावला संपवण्याचा कट रचला. मुलीने फोन करुन गोरखला लोहणरे गावातील एका मंदिराजवळ भेटायला बोलावलं. मुलगी आणि तिच्या घरचेही त्या ठिकाणी पोहचले. पण पोहचण्याआधी मुलीने दुकानातू रॉकेल विकत घेतलं. 

बोलवल्या प्रमाणे गोरख बच्छाव मंदिराजवळ आला असता मुलगी तिचे आई, वडील आणि दोन भावांनी मुलीचं लग्न का मोडलं असा जाब विचारत त्याच्यावर वार केले. त्याचवेळी संतापलेल्या मुलीने गोरखवर रॉकेल टाकलं आणि त्याला पेटवून दिलं. यात गोरख ५५ टक्के भाजला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर नाशिकमधल्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘सरकारी नोकर आहे, तुमची नाही,’ महिला शिपायाने पाणी देण्यास नकार देताच मॅजिस्ट्रेट संतापले, म्हणाले ‘तुझी आता…’

सोशल मीडियावर बिहारच्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महिला …

कारवाई टाळण्यासाठी मागितली एक लाखांची लाच; सोलापुरात PSI ला अटक

अभिषेक अडेप्पा, झी मीडिया, सोलापूर :  सोलापूर शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर …