वर दिलेल्या फोटोमध्ये मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री एकत्रित पाहायला मिळत आहेत. बहुतेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतात अश्याच एका आठवणीला इथेही उजाळा दिलेला पाहायला मिळतोय. त्यातच खास मैत्रिणीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या ज्येष्ठ अभिनेत्रीने खास फोटो शेअर केलेले पाहायला मिळत आहेत. बहुतेक प्रेक्षकांनी या दोन्ही अभिनेत्रींना ओळखलेही असेल. फोटोमध्ये दिसणाऱ्या या अभिनेत्री आहेत नीना कुलकर्णी आणि भारती आचरेकर.

भारती आचरेकर यांचा आज १३ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नीना कुलकर्णी यांनी त्यांच्यासोबत असलेले खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. स्वराज्य जननी जिजामाता, नायक, हाच सुनबाईचा भाऊ, सवत माझी लाडकी, दाग द फायर, ढाई अक्षर प्रेम के, बादल, फिर भी दिल है हिंदुस्थानी, शेवरी, नितळ, उत्तरायण, पहेली अशा अनेक हिंदी मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून नीना कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अभिनेत्री भारती आचरेकर आणि नीना कुलकर्णी यांची खूप अगोदरपासून चांगली गट्टी जमली. हिंदी रंगभूमीवर काम करत असताना या दोघींमध्ये चांगली मैत्री जुळून आली होती. आजही आपल्या कुटुंबासह या दोघी एकमेकींच्या प्रत्येक कार्य समारंभात हजेरी लावताना दिसतात. त्यांच्यातले इतके वर्षांचे मैत्रीचे संबंध आजही असेच अबाधित असलेले पाहायला मिळतात. अगदी दिलीप कुलकर्णी सोबत नीना कुलकर्णी विवाहबंधनात अडकल्या होत्या त्या दिवशीही भारती आचरेकर यांनी त्यांच्या लग्नसोहळ्याला आवर्जून हजेरी लावलेली पाहायला मिळाली होती.

भारती आचरेकर या प्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांच्या कन्या आहेत. तर अभिनेत्री वंदना गुप्ते आणि गायिका राणी वर्मा या त्यांच्या सख्ख्या बहिणी आहेत. भारती आचरेकर यांनी रंगभूमिपासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. मराठी चित्रपट सृष्टीसोबतच हिंदी सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. हिंदी मालिकांमधून त्यांच्या वाट्याला बहुतेकदा विनोदी भूमिका आलेल्या पाहायला मिळाल्या. वागळे की दुनिया, अगली और पगली, चष्मेबद्दूर, FU फ्रेंडशिप अनलिमिटेड, अर्धांगी, सातच्या आत घरात, सनई चौघडे, दिवसेंदिवस, वळू, आगे से राईट, चिडीयाघर, लापतागंज अशा हिंदी तसेच मराठी चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी सहाय्यक भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. काल वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांना सुदृढ आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा…