पार्लरमध्ये केसांना रंग करताना अचानक गळू लागले केस, डोक्याची झाली लाही लाही, कलर करताना या गोष्टी लक्षात ठेवा

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशात एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला ब्युटी पार्लरमध्ये केसांना रंग लावताना दिसत आहे. पण काही वेळानी या महिलेच्या केसांची खुपत आग होते. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात केस गळू लागतात. हा व्हिडीओ पाहून तुमचा देखील थरकाप उडू शकतो. त्यामुळेच यापुढे ब्युटी पार्लरची स्वच्छताच नव्हे तर वापरलेल्या उत्पादनांची गुणवत्ता सुद्धा पाहायला विसरु नका. (फोटो सौजन्य: @istock, hairsalonfeed )

केसांची अशी घ्या काळजी

​नक्की काय आहे हे प्रकरण

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर @hairsalonfeed या अकाउंटवरुनसध्या हा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाण व्हायरल होत आहेत. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज व ६९ हजाराहून अधिक लाईक्स आहेत. साध्या लग्नांचा सिझज चालू झाला आहे. तरकेसाला रंग करण्यासाठी, हायलाईट्ससाठी पार्लर्समध्ये गर्दी पाहायला मिळते. पण तुम्ही केसांना काय लावता याचा विचार करणे फार महत्त्वाचे आहे.

हेही वाचा :  मालकीणीला घराबाहेर जाऊ द्यायचं नाही म्हणून मांजरीने काय शक्कल लढवली, पाहा VIRAL VIDEO | story viral video of cat hanging on clawing the key ring string to stop woman from going out prp 93

​व्हिडीओत नक्की आहे तरी काय

या व्हिडीओत एक महिला जी एका ब्युटी पार्लरमध्ये केसाला कलर करण्यासाठी गेलेली दिसत आहे. यावेळी ब्युटिशयन काही केमिकल मिक्स करून तिच्या केसाला लावून ठेवतात. पण हे केमिकल बहुधा जास्त प्रमाणात पडल्याने या महिलेच्या केसांच्या मुळांना प्रचंड जळजळ जाणवू लागते. काहीच वेळात महिलेच्या डोक्यावर असा जाळ जाणवू लागतो की ती वेदनेने कळवळून उठते आणि घाबरून आरडा ओराडा देखील करु लागते. (वाचा :- Hair Fall: दररोज किती केस गळणे सामान्य आहे, डॉक्टरकडे कधी जावे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सगळं काही )

​हातात आली एक एक बट

त्यानंतर तिला केस धुण्यासाठी घेऊन जातात पण जसे ते केसाला हात लावतात तशी त्या महिलेच्या केसाची एक एक बट सुटून हातात येऊ लागते. व्हिडिओच्या अगदी शेवटी जेव्हा थंड पाणी या महिलेच्या डोक्यावर पडते तेव्हा ती थोडी शांत झालेली दिसते. (वाचा :- मेथीच्या दाण्यांपासून मिळवा घनदाट आणि लांब केस, लोक सुद्धा विचारू लागतील तुमच्या सुंदर केसांचे रहस्य)

​केस धुण्याची योग्य पद्धत

सुंदर केसांसाठी शॉम्पू करण्याआधी केसांना वाफ द्या. त्यामुळे केस खराब होण्यापासून वाचतील. वाफ घेतल्यानंतर केसांना हलक्या हाताने मसाज करा. केस धुण्यासाठी खूप गार पाणी किंवा खूप गरम पाणी घेणे टाळा. पाणी जास्त गरम किंवा गार असेल तर केस कोरडे होऊ शकतात. काही जणांना रोज केस धुण्याची सवय असते पण असे न करणे योग्य. त्यामुळे आठवड्यातून जास्तीत जास्त दोन वेळा केस धुवावेत. (वाचा :- त्वचेशी संबंधित ‘या’ समस्यांचे कारण कोरोना असू शकतो, वाचा डॉक्टरांचे मत )

हेही वाचा :  समान नागरी कायद्याला ठाकरे गटाचा पाठिंबा? संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले "हिंदू, मुस्लीम...."

​हेअर केअर उत्पादनांबाबत ही गोष्ट लक्षात घ्या

हेअर स्प्रे, सिरम यांमुळे केसांचा पोत खराब होतो. त्यामुळे अशाप्रकारची उत्पादने वापरताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. या उत्पादनांबाबत योग्य ती काळजी घेऊन, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ही उत्पादने वापरणे आवश्यक आहे. (वाचा :- वजन झटपट कमी करण्यासाठी आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी रोज सकाळी प्या हा चहा, आठवड्याभरात रिझल्ट येईल)Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींच्या मनमानीविरुद्ध..’, ‘सत्तेतले नक्षलवादी’ म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं …

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशात हजेरी लावल्यानंतर दक्षिणेकडील राज्य आणि महाराष्ट्राचा काही भाग …