घटस्फोटाच्या मद्द्याला पूर्णविराम!, शोएब मलिकने सानियाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणाल

प्रेमात आपण दुसऱ्या व्यक्तीला दु:खात पाहू शकत नाही असं म्हटलं जातं. प्रेमाने संपूर्ण जग जिंकता येतं प्रेमाला कोणत्याच सीमा नसतात असं म्हणतात. पण सध्या सर्वकडे घटस्फोटाच्या किंवा विभक्त होण्यच्या बातम्या वाचायला मिळत आहेत. भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचे लग्न मोडण्याच्या मार्गावर असल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला होता.हे दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याचा खुलासा सानिया-शोएबच्या जवळच्या मित्राने केला होता. पण या मुद्याला आता पूर्ण विराम मिळाला आहे. आज सानियाचा वाढदिवसा निम्मीताने शोएबने त्याच्या लाडक्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावरुन त्याच्या घटस्फोटाच्या मद्द्याला पूर्णविराम मिळाला आहे असं आपण म्हणू शकतो. ( फोटो सौजन्य : @mirzasaniar)

​काय आहे पोस्ट

यावेळी शोएबने त्याच्या लाडक्या पत्नीसाठी एक पोस्ट लिहून त्याच्या नात्यात कोणतीही कटूता नाही या गोष्टीवर शिक्कामोर्तब केला आहे. यावेळी शोएबने तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सानिया तुला निरोगी आणि आनंदी आयुष्याच्या मिळो ! प्रत्येक दिवसाचा पुरेपूर आनंद घे.. असे लिहून त्या दोघांचा एक क्युट फोटो देखील त्याने शेअर केला आहे. शोएबची ही पोस्ट पाहून त्याच्या नात्या संदर्भात असणाऱ्या सर्व अफवाच होत्या असं आपण म्हणू शकतो. (वाचा :- ‘जिंदगी को बेरंग कर देती है…’, मानसी नाईकच्या त्या’ पोस्टमुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण)

हेही वाचा :  नेटकऱ्यानं विचारलेल्या प्रश्नाला पाकिस्तानी अभिनेत्री आयशानं दिलं उत्तर

लाडक्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

​काय होत्या चर्चा

सानिया-शोएबने त्यांच्या नात्याबद्दल पाकिस्तानी मीडियाचे म्हणणे आहे की शोएबने त्याच्या एका टीव्ही शोमध्ये सानियाची फसवणूक केली. वास्तविक, घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएबचे नाव पाकिस्तानची प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आयशा कमर हिच्याशी जोडले जात आहे. शोएब मलिकने आयशासोबत बोल्ड फोटोशूट केले होते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून जेव्हा शोएबला एका मुलाखतीत विचारण्यात आले की, यावर तुमची पत्नी काय म्हणाली? त्यामुळे सानियाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे उत्तर त्याने दिले. या गोष्टीवरुन गेल्या काही दिवस अनेक चर्चा रंगल्या होत्या. उत्तम नात्यासाठी आपण काही गोष्टी फॉलो करु शकतो. (वाचा :- शोएब मलिकशी लग्न करण्यासाठी सानिया मिर्झाने तोडला होता साखरपुडा, आणि आज या नात्यावर घटस्फोटाचे ढग)

​वाद संपवायला शिका

वाद कोणाच्या आयुष्यात नसतात. तुमच्या आयुष्यात निर्माण झालेले वाद संपवायला शिका हे वाद तुमच्या डोक्यात राहिल्याने तुम्हालाच त्रास होईल. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील वाद संपवा आणि मग पुढे जा. सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट टाकण्यापूर्वी विचार करा. (वाचा :- माझी कहाणी: कशी नशिबाने थट्टा मांडली, ज्या व्यक्तीचा मी प्रचंड तिरस्कार केला, त्याच्याच सोबत लग्न माझं होणार आहे)

हेही वाचा :  मुलांना शिकवलं त्याचं हे फळ आहे... खंत व्यक्त करत हतबल बापाने स्वतःला संपवलं...

​​सन्मान द्यायला हवा

आपण कसं वागवं? काय करावं असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात. पण या प्रश्नांची उत्तरे आपल्याला वेळ देते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा सन्मान करा. तुमच्या जोडीदाराचा सन्मान करायला शिका. (वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

​​मनातील ​गोष्टी शेअर करणे

आपल्या जोडीदाराच्या मनात काय चालू असंत हे जाणून घेण्याची प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते. पण आज काल लोक फोन आणि कामात एवढे व्यस्त झाले आहेत की आपल्या जवळच्या लोकांची किंमत खूप कमी झाली आहे. आपल्या व्यक्तीसोबत गोष्टी शेअर करणे त्यांना कळतच नाही. तुम्ही जर तुमच्या मनातील गोष्टी इतरांसोबत शेअर केल्यात तर तुमच्यातील प्रेम कायम राहण्यास मदत होईल. जर तुम्ही नविन काही वाचले असेल तर ते तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत शेअर करु शकता. त्यामुळे तुमचे नातं अजून घट्ट् होईल. त्याच प्रमाणे तुमची वैचारीक वृद्धी देखील होण्यास मदत होईल.

(वाचा :- माझी कहाणी : लग्नाच्या 5 वर्षांनंतर मी पुन्हा माझ्या EX ला भेटले, त्यानंतर जे झालं ते सांगायला ही मला लाज वाटते)

हेही वाचा :  शोएब मलिकशी लग्न करण्यासाठी सानिया मिर्झाने तोडला होता साखरपुडा, आणि आज या नात्यावर घटस्फोटाचे ढग

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …