युट्यूबर नामरा कादिरला अटक; व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप

Namra Qadir:  एका व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याची लाखो रुपयांची फसणुकीचा आरोप नामरा कादिरवर (Namra Qadir) करण्यात आला आहे. गुरुग्राम पोलिसांनी प्रसिद्ध युट्यूबर नामरा कादिरला अटक केली आहे. पोलीस सध्या तिची चौकशी करत आहे. नामरा कादिरला सोमवारी दिल्लीतून अटक करून दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले, तिला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे समोर आलं आहे की,  नामरा ही विवाहित असून ती एका मुलाची आई आहे. नामर कादीरचा पती ​​विराट बेनिवाल सध्या फरार आहे. त्याच्या शोधासाठी छापेमारी सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

नामरावर आरोप आहे की, तिनं तिच्या पतीसह गुरुग्रामच्या एका व्यावसायिकाची फसवणुक केली आहे. नामरानं त्या व्यवसायिकाला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. 24 नोव्हेंबर रोजी पीडित व्यावसायिकाने सेक्टर 50 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी नामराला अटक केली.

नामरा कादिरच्या विरुद्ध तक्रार करणाऱ्या व्यावसायिकाने तक्रारीत लिहिले आहे की, त्याची कामानिमित्त सोहना रोडच्या रेडिसन हॉटेलमध्ये नामरा कादिरसोबत भेट झाली होती. ती प्रसिद्ध युट्यूबर आहे त्याला माहित होते, तिचे व्हिडिओ त्याने पाहिले होते. तिनं  विराट बेनिवालशी त्याची ओळख करून दिली जो एक यूट्यूबर आहे. तो तिचा त्याचा जवळचा मित्र आहे, असंही तिनं त्या व्यावसायिकाला सांगितलं. त्या व्यवसायिकाच्या फर्ममध्ये काम करण्यासाठी ती तयार झाली त्यानंतर तिनं त्याच्याकडून दोन लाख रुपये अॅडव्हान्स घेतले. 

हेही वाचा :  Bedhadak : करण जोहरच्या 'बेधडक' सिनेमातील शनाया कपूरचा फर्स्ट लूक रिलीज

कोण आहे नामरा कादिर?

News Reels

नामरा कादिर ही प्रसिद्ध युट्यूबर आहे. तिच्या युट्यूब चॅनला 6 लाख पेक्षा जास्त लोक फॉलो करतात. तसेच इन्स्टाग्रामवर तिला 2 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Entertainment News Live Updates 7 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …