Mazhi Tuzhi Reshimgath : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेत्री रुग्णालयात दाखल

Swati Deval : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. आता या मालिकेत परीच्या मामीच्या भूमिकेत असणारी अभिनेत्री स्वाती देवलला (Swati Deval) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिने यासंदर्भात माहिती दिली आहे. 

स्वातीने लिहिलं आहे,”काल एक छोटी सर्जरी झाली असून आता मी ओके आहे. यावर्षी जाणते, अजाणतेपणी खूप लोकांचे मनापासून आशीर्वाद मिळाले आहेत. मी मनापासून तुमची आभारी आहे. काळजी तर घ्याचीच आहे. आपणच आपल्या शरीराची काळजी घ्यायला हवी. आपल्या शरीराला रोजच्या जगण्यात पौष्टिक, सकस आहाराची गरज आहे”. 

स्वातीने पुढे लिहिलं आहे,”पूर्वी पोहे, उपमा, डोसे, फोडणीची पोळी घरी बनवली जायची. पण आता आपण कंटाळा करतो. मोठे झालो..अतिरिक्त बुद्धी आली की मग वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधले पदार्थ मित्र-मैत्रिणींसोबत चाखायची सवय लागते…चटकदार खायची जिभेची सवय जाऊ शकत नाही. आपल्या शरीरासाठी स्वयंपाक करायचा कंटाळा कसला हो आजही शूटला मी माझा डबा नेते. शरीराचे लाड किती पुरवायचे हे आपल्याला स्वत:ला समजायला हवं.”


स्वातीने तिच्या पोस्टमध्ये रुपाली भोसलेचेदेखील आभार मानले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी रुपालीने रुग्णालयातील फोटो शेअर करत शरीराची काळजी घेण्याचा सल्ला चाहत्यांना दिला होता. आता स्वातीने रुपालीचे आभार मानत म्हटलं आहे,”रुपाली भोसले, मैत्रिणी.. तशी मी घाबरटच पण तुझी पोस्ट वाचून धैर्य आलं आणि लगेच निर्णय घेतला”. तसेच तिने डॉक्टरांचे, मालिकेच्या टीमचे आणि नवऱ्याचेदेखील आभार मानले आहेत. तिच्या नवऱ्याने म्हणजेच तुषार देवलने पेज बनवून तिला भरवण्यापासून ते पाय दाबून देण्यापर्यंत स्वातीची सेवा केली आहे. 

हेही वाचा :  Zee Studio : शिवरायांचा इतिहास गैरपद्धतीने प्रेक्षकांसमोर पोहोचणार नाही : झी स्टुडिओ

संबंधित बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah फेम अभिनेत्रीच्या कारला ट्रकची धडक; अपघातातून थोडक्यात बचावली



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …