Tumchi Mulgi Kay Karte : किलवरचं रहस्य अखेर उलगडणार!

Tumchi Mulgi Kay Karte : ‘तुमची मुलगी काय करते’ (Tumchi Mulgi Kay Karte) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील अनपेक्षित वळणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून आता या मालिकेचा विशेष भाग पार पडणार आहे. 

वेगळ्या धाटणीची आणि अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे ‘तुमची मुलगी काय करते’ ही मालिका होय. चित्तथरारक अशा या मालिकेत अनेक अनपेक्षित वळणं पाहायला मिळत आहेत. किलवरचा शोध घेता घेता मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. 

आता भोसले किलवरचा थरारक शोध घेणार आहे आणि खरा किलवर जगासमोर येणार आहे. यासोबतच आजवर मालिकेत निरनिराळे रंजक भाग पाहायला मिळाले. मालिकेतली उत्कंठा कायम राखत गुप्तता पाळण्यात टीम यशस्वी ठरली. त्यामुळेच मालिकेतली रंजकता कायम राहिली.


‘तुमची मुलगी काय करते’ ही मालिका आता शेवटापर्यंत येऊन पोचली आहे आणि हा थरारक आठवडा पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे. भोसले किलवरला कशा प्रकारे पकडेल, हे येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या मालिकेचे बंगाली भाषेत डबिंग झाले आहे. प्रेक्षकांच्या उत्साहात भर पडली आहे. ‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

हेही वाचा :  'Bigg Boss 16' आपला माणूस शिव ठाकरे जिंकणार?

‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेचा महाएपिसोड येत्या रविवारी म्हणजेच 15 जानेवारीला होणार आहे. रविवारी रात्री 10 वाजता प्रेक्षक हा महाएपिसोड सोनी मराठीवर पाहू शकतात. मालिका शेवटापर्यंत आली असल्याने आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचीदेखील चर्चा आहे. 

संबंधित बातम्या

Tumchi Mulgi Kay Karte : ‘तुमची मुलगी काय करते’ आता बंगाली भाषेत डब होणार; मालिका उत्कंठावर्धक वळणावरSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …