कर्नाटकात अंगावर काटा आणणारा भीषण अपघात, धडकेनंतर कारचा अक्षरश: चुराडा; बसही पुढून चेपली; 10 ठार

Accident News: कर्नाटकमध्ये (Karnataka) एक भीषण अपघात झाला आहे. कार आणि खासगी बसमध्ये धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. अपघातात 10 जण जागीच ठार झाले असून यामध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे. तसंच पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. तिरुमाकुडालू नरसीपुरा शहराजवळ सोमवारी हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. तसंच बसही पुढून चेपली असून तिच्या काचा फुटल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्लेगला-टी नरसीपुरा मुख्य रस्त्यावर कुरुबुरु गावाजवळ हा अपघात झाला आहे. घटनास्थळावरील फोटो समोर आले असून यामधून या अपघाताची भीषणता जाणवत आहे. फोटोंमध्ये दिसत आहे त्यानुसार कार आणि खासगी बसची समोरासमोर धडक झाली आहे. अपघात इतका भीषण होता की, कारचा पूर्ण चुराडा झाला आहे. दरम्यान, अपघातात बसचंही मोठं नुकसान झाल्याचं दिसत आहे. कारण बस पुढून पूर्णपणे चेपलेली असून काचा फुटलेल्या दिसत आहेत. 

अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी या अपघाताची दखल घेतली आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. ट्वीट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. 

हेही वाचा :  Maharashtra - Karnataka border dispute : कर्नाटकचा पुनरुच्चार, 'महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही'

मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे की, “टी नरसीपुरा येथे झालेल्या अपघातात 10 निर्दोष व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर मी अस्वस्थ आहे”.

“अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून 2 लाखांची मदत केली जाईल. जखमींना योग्य उपचार मिळावेत यासाठी मी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत,” अशी माहिती त्यांनी ट्वीटमधये दिली आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …