Delhi Girl Drag Case : ‘ती’ तरुणी कारच्या चाकात अडकली पण…; ‘त्या’ घटनेचा पहिलाच Video पाहून अंगावर येईल काटा

Delhi Girl Dragged to Death  : वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत (delhi crime) एक धक्कादायक घटना घडली आहे.  स्कूटीवरुन घरी जाणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीला कार चालकाने धडक दिली. ती तरूणी स्कुटीवरून खाली पडली आणि कारच्या चाकात अडकली. त्या कार चालकाने गाडी न थांबवता यू-टर्न घेतला आणि कार न थांबवता तरुणीस तब्बल 7 ते 8 किमी फरफटत घेऊन गेला. या घटनेत 23 वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला. त्यानंतर दिल्ली पोलीसांनी (delhi police) पाचही आरोपींना अटक केली असून या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. 

रविवारी (1 जानेवारी 2023) दिल्लीत तीन वाजता पोलिसांना कांजवाला परिसरात पीसीआर कॉल आला. रस्त्याच्या कडेला एक जखमी तरुणी विवस्त्र अवस्थेत पडल्याचे सांगण्यात आले. या माहितीनंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता तेथे तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. मुलीच्या अंगावर कपडे नव्हते. शरीराचा बराचसा भाग रस्त्यावर घासून-घासून गायब झाला होता. दरम्यान या घटनेतील सीसीटीव्ही समोर आला असून कांजवाला परिसरात एक तरूणी बलेनो कारच्या खाली अडकलेली दिसत होती. कार चालक तिला ओढून यू-टर्न घेताना दिसत आहे. 

हेही वाचा :  सर्वात पहिली पाणीपुरी कोणी बनवली? महाभारतासोबत आहे कनेक्शन

वाचा : राजधानी नव्हे ‘जीव’घेणी दिल्ली! ‘त्या’ तरुणीला कारमधून…. प्रत्यक्षदर्शींचं बोलणं ऐकून हातपाय सुन्न पडतील 

‘वाहनाने पुढे यू-टर्न घेतला होता’

प्रत्यक्षदर्शी दीपकने सांगितले की,  सुरूवातीला गाडी नॉर्मल स्पीडमध्ये होती आणि ड्रायव्हर नॉर्मल असल्याचं दिसत होतं. पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास दीपक दूध वितरणाची वाट पाहत असताना त्यांना एक कार येताना दिसली. त्या गाडीच्या मागच्या चाकांमधून मोठा आवाज येत होता. त्यानंतर दिसल की एक मुलगी चाकामध्ये अडकली असताना त्या कार चालकाने यू-टर्न घेतला. मृतदेह गाडीत अडकेपर्यंत तो इकडे-तिकडे गाडी चालवत राहिला. त्यानंतर मृतदेह खाली पडला आणि हे पाहताच कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. सुलतानपुरी भागात, एसएचओने रात्रीच्या गस्तीदरम्यान स्कूटी अपघातग्रस्त स्थितीत पाहिली आणि 3.53 वाजता पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली.
  
दिल्ली आऊटरचे डीसीपी हरेंद्र सिंह यांनी सांगितले की, सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल. त्यांनी दारू प्यायली होती की नाही याची पुष्टी करण्यासाठी आरोपींच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. पोस्टमार्टम बोर्ड तयार करण्याची विनंती करण्यात आली आहे. तीन डॉक्टरांचे पथक शवविच्छेदन करणार आहे. तसेच डीसीपी हरेंद्र सिंह यांनी सांगितले की, अटक केलेल्या पाच मुलांनी सांगितले की मुलगी गाडीखाली अडकली होती, त्यामुळे ती दिसली नाही. सध्या मुलीला 4-5 किलोमीटरपर्यंत ओढून नेण्यात आल्याची पुष्टी झाली आहे. परंतु दिल्ली पोलिस पुन्हा गुन्ह्याच्या ठिकाणाची पाहणी करणार आहेत. आरोपींना जामीन मिळू नये म्हणून दिल्ली पोलीस आपल्या कायदेशीर टीमच्या संपर्कात आहेत.

हेही वाचा :  Measles News Update : गोवरने चिंता वाढवली, आता आणखी एका जिल्ह्यात शिरकाव

पोलिसांना दोन कॉलवर माहिती मिळाली होती

पोलिसांनी सांगितले की, एक करड्या रंगाची कार कुतुबगडच्या दिशेने जात असल्याची माहिती कोणीतरी कॉलवर दिली होती. त्यात एक मृतदेह अडकलेला दिसत आहे. यानंतर लगेचच बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांना सतर्क करण्यात आले. पोलिसांनी गाडीचा शोध सुरू केला. काही वेळाने पोलिसांना पीसीआरचा कॉल आला. कांजवाला पोलीस ठाण्यात एका मुलीचा मृतदेह रस्त्यावर पडून असल्याचे फोनवरून सांगण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी केली. मुलीचा मृतदेह समुद्रकिनारी पडून होता. अंगावर एकही कपडा नव्हता. रस्त्यावर ओढले गेल्याने मुलीचे पाय गायब झाले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी एसजीएम हॉस्पिटल मंगोलपुरी येथे पाठवला, मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे.

पाचही आरोपींना अटक

मुलीसोबत गैरवर्तन करणारे पाच मुले दिल्लीतील आहेत. त्यापैकी काही केशभूषा करणारे तर काही रेशनचे व्यापारी आहेत. पोलिसांनी कारमधील पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी 26 वर्षीय दीपक खन्ना यांचा मुलगा राजेश खन्ना ग्रामीण सेवेत चालक पदावर आहे. याशिवाय अमित खन्ना (25) हा उत्तम नगरमध्ये एसबीआय कार्डसाठी काम करतो. दीपक खन्ना गाडी चालवत होते.

हेही वाचा :  हरिशचंद्र गडावर गेलेल्या पर्यटकाचा मृत्यू नेमका कसा झाला? दोन दिवसानंतर समोर आले सत्य



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …