Delhi Crime: राजधानी नव्हे ‘जीव’घेणी दिल्ली! ‘त्या’ तरुणीला कारमधून…. प्रत्यक्षदर्शींचं बोलणं ऐकून हातपाय सुन्न पडतील

Delhi Crime News In Marathi :  एकीकडे राजधानी दिल्लीत नववर्षाचा जल्लोष सुरू होता. तर दुसरीकडे दिल्लीला राजधानी म्हटलं  जातं, त्या राजधानीत दिवसेंदिवस तरुणीच्या निर्घृण हत्येच्या धक्कादायक घटना समोर येतात. परिणामी हि दिल्ली राजधानी की जीवघेणी आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. काल नवीन वर्षाचा पहिला दिवस होता. याच दिवशी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली असून कारमधील 5 तरुणांनी स्कूटीवरुन घरी जाणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीला त्यांच्या कारनं उडवलं आणि चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर दिल्ली पुन्हा हादरली आहे. 

रविवारी (1 जानेवारी) दिल्लीत तीन वाजता पोलिसांना कांजवाला परिसरात पीसीआर कॉल आला. रस्त्याच्या कडेला एक जखमी तरुणी विवस्त्र अवस्थेत पडल्याचे सांगण्यात आले. या माहितीनंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता तेथे तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. मुलीच्या अंगावर कपडे नव्हते. शरीराचा बराचसा भाग रस्त्यावर घासून-घासून गायब झाला होता. या प्रकरणी तरूणीचा वैद्यकीय अहवाल आणि प्रत्यक्षदर्शीच्या जबाबातून नवा ट्विस्ट समोर आला आहे.

वैद्यकीय अहवालात डॉक्टरांनी केवळ मुलीच्या डोक्यावर झालेल्या दुखापतीचा उल्लेख केला आहे. तर दुसरीकडे या घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीने धक्कादायक माहिती दिली असून, पाच मुलांनी त्या तरुणीला कारमधून फेकून दिले असल्याची माहिती दिली.

हेही वाचा :  हेच खरं Valentine!लग्नाच्या अवघ्या 2 महिन्यात किडनी खराब, पतीने अस दिलं जीवनदान

असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला

मुलीच्या शरीराचा वरचा भाग विकृत झालेला नसल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीने केला आहे. पोलीस जवळ येत असल्याचे पाहून आरोपींनी मृतदेह कारबाहेर फेकून दिला. ही घटना 31 डिसेंबर 2022 आणि 1 जानेवारी 2023 च्या रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी कारमधील पाच तरुणांना अटक केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

अफवा पसरवू नका – पोलिस 

हे प्रकरण केवळ अपघाताचे असून सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नका, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पीडितेला मदत करण्याऐवजी आरोपी गाडी चालवत राहिला. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे.

मुलीची आई काय म्हणाली?

मुलीच्या आईने सांगितले की, माझी मुलगी माझ्यासाठी सर्व काही आहे. ती काल पंजाबी बागेत कामावर गेली होती. माझी मुलगी सायंकाळी 5.30 च्या सुमारास घरातून निघून गेली आणि ती रात्री 10 वाजेपर्यंत परत येईल असे सांगितले. मला सकाळी त्याच्या अपघाताबद्दल सांगण्यात आले, पण मी त्याचा मृतदेह पाहिला नाही. 

हेही वाचा :  Maharashtra Rain News : आज राज्याच्या 'या' भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज; निसर्ग धडकी भरवणार

तपासाअंती पोलिसांनी पाच आरोपी तरुणांना मुलांना पकडलं असून कार जप्त करण्यात आली आहे. कारमधील मुलांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. ही मुलं दारुच्या नशेत होती का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. सध्या तरी पोलिसांना या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही मिळालेले नाहीत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …