अरूंधतीच्या गालावर खळी नाही ही तर जखम, मधुराणीकडून मोठा खुलासा, ‘या’ आजाराचे नाव काय?

‘आई कुठे काय करते’ ही मालिका अतिशय लोकप्रिय असून ही मालिका प्रेक्षकांच्या अतिशय जवळचं आहे. मालिकेतील लोकप्रिय पात्र म्हणजे अरूंधती. अरूंधती हे पात्र अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर साकारत आहे. मधुराणीने नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत तिने आपल्या गालावरच्या जखमेबद्दल सांगितलं आहे.

गेल्या एक वर्षापासून चाहत्यांना मधुराणीच्या गालावरचा बदल दिसत होता. गालावर खळी आहे की जखम असा प्रश्नही चाहत्यांना पडला. अखेर मधुराणीने वर्ष सरता सरता याचा खुलासा केला आहे. (फोटो सौजन्य – Madhurani Gokhale Prabhulkar इंस्टाग्राम)

​मधुराणीने केला खुलासा

मधुराणीने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओची सुरूवात करताना सांगितलं आहे की, मी आज माझ्या गालावरच्या जखमेविषयी बोलणार आहे. गेल्या वर्षभरात या जखमेने मला भरपूर शिकवलं आहे. स्वतःकडे आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन या जखमेमुळे पूर्णपणे बदलला आहे.

मधुराणीच्या जखमेमागे हा आजार

मधुराणी प्रभुलकरने व्हिडीओत आपल्या जखमेबद्दल सांगितलं आहे. यामध्ये गालावर एक प्रकारचा उंचवटा येतो. दीड वर्षापूर्वी मधुराणीच्या गालावर अचानक एक उंचवटा आला, या उंचवट्याला सीबीशीएस्ट सिस्ट असे म्हणतात.

हेही वाचा :  अरुंधतीचा ऑरेंज पैठणीचा लग्नाचा लुक, चाहत्यांच्या नजरा हलल्याच नाहीत

​मधुराणीने असे केले उपचार

दीड वर्षांपूर्वी मधुराणीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये यावर शस्त्रक्रिया केली. ही जखम भरून यायला मधुराणीला वेळ लागला. या जागेवर एक खळी तयार झाली. मात्र पुन्हा वर्षभरानंतर गालाच्या आतून एक उंचवटा जाणवयला लागला. या जखमेतून बाहेरच्या बाजूने पस येऊ लागला. तेव्हा मधुराणाने पुन्हा एकदा सर्जरी केली. यावेळी मात्र मधुराणीने लेझर सर्जरीची मदत घेतली.

​काय आहे हा आजार?

सेबेशियस सिस्ट हा त्वचेवर आढळणारा एक अतिशय सामान्य रोग आहे. हे गळू शरीरात कुठेही येऊ शकतात. पोत बद्दल बोलायचे तर, ते थैलीच्या आकाराचे बंद संरचनेचे आहे. वैद्यकीय भाषेत, प्रथिने, त्याच्या आत केराटिन जमा होते. जेव्हा शरीरातील सेबेशियस ग्रंथी किंवा तेल-उत्पादक ग्रंथी अवरोधित होतात तेव्हा हे सहसा उद्भवते. काहीवेळा तो लवकर बाहेर पडतो तर कधी अनेक वर्षे शरीरात राहतो. सेबेशियस सिस्ट हे सामान्यतः कर्करोग नसलेल्या गाठी असतात, परंतु काहीवेळा लोक कर्करोगाच्या गाठींना सेबेशियस सिस्ट समजत दुर्लक्ष करतात.

​कुठे होते ही जखम?

बहुतेक सेबेशियस सिस्ट चेहरा, मान आणि खांद्याभोवती आढळतात. काही लोकांमध्ये, ते योनी किंवा जननेंद्रियाच्या आसपास देखील आढळतात. सेबेशियस सिस्ट खूप हळू वाढते. सेबेशियस सिस्टमध्ये सामान्यतः कमी किंवा वेदना होत नाही. बहुतेक सेबेशियस सिस्टला उपचारांची आवश्यकता नसते. परंतु त्वचेवर कोणतीही गाठ नेहमी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

हेही वाचा :  दिल्ली क्राईममधील तडफदार ऑफिसर ते वनपिसमधील 49 व्या वर्षांच्या शेफाली शाहांचा ग्लॅमरस अदा, अगदी फाईन वाईन

​काही जखम अतिशय धोकादायक

काही सेबेशियस सिस्ट्स धोकादायक रूप देखील घेऊ शकतात. सेबेशियस सिस्टमध्ये वेदना होत असल्यास, त्वचेची चाचणी केली पाहिजे. काही प्रकरणांमध्ये, बायोप्सी देखील आवश्यक असू शकते. बहुतेक सेबेशियस सिस्ट हे कर्करोग नसलेले असतात.

​किती दिवस असतो हा उंजवटा

काही सेबेशियस सिस्ट स्वतःच नाहीसे होतात तर काही शरीरात कायमचे राहतात. दुखण्यासारखी लक्षणे नसतील तर त्यांची छेड काढू नये.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …

जगातील 50 श्रीमंत शहरांच्या यादीत भारतातील दोन प्रमुख शहरं; Washington DC लाही टाकलं मागे

Worlds 50 Wealthiest Cities: जगातील सर्वात श्रीमंत 50 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक …