WhatsApp ने आणलं भन्नाट फिचर; एका झटक्यात सुधारा तुमची चूक…

WhatsApp Edit Message Feature: जगातील अनेक व्यक्तींना जवळ आणण्याचं काम केलं ते WhatsApp नावाच्या या अॅपने. तुम्ही कुठेही असला तरी कम्युनिकेशन हा सर्वात मोठा फंडा असतो. WhatsApp ने मानवी संवादाला एक ऑनलाईन वळण दिलं आणि सर्वांचं काम सोपं केलंय. आज सर्वजण व्हॉट्सअॅप वापर करतात. कामाच्या महत्त्वाच्या ठिकाणी देखील व्हॉट्सअॅपचा वापर केला जातो. व्हॉट्सअॅपने देखील लोकांना वेगवेगळ्या फिचर्सच्या माध्यमातून आधुनिक ऑनलाईन सेवा पुरवल्या आहेत. अशातच आता सर्वांना ज्याची प्रतिक्षा होती, ती सेवा सुरू झाली आहे.

WhatsApp चं नवं फिचर…

व्हॉट्सअॅपने अखेर सर्वांसाठी नवीन एडिट बटण फीचर लाँच केलं आहे. हे एडिट बटण एक अतिशय उपयुक्त वैशिष्ट्य ठरणार आहे, त्याला कारण म्हणजे आता संपूर्ण मॅसेज हटवण्याची आवश्यकता नाही, एडिट बटणाच्या वापरातून तुम्हाला वाक्य किंवा शब्द दुरुस्त करू देईल.

चुकीला 15 मिनिटं माफी

व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना त्यांनी कोणाला पाठवलेले चुकीचे संदेश बदलण्यासाठी 15 मिनिटांची अवधी मिळणार आहे. एकदा मॅसेज पाठवताना जर तुमच्याकडून चूक झाली तर पुढील 15 मिनिटात तुम्ही मॅसेज एडिट करू शकता. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमच्या म्हणण्याचा योग्य अर्थ लागू शकतो.

कशी एडिट कराल?

मेसेज पाठवल्यानंतर 15 मिनिटांच्या आत तुम्हाला तो मेसेज दुरूस्त करायचाय, त्यावर काही काळ टॅप करून धरून ठेवावा लागेल आणि नंतर मेनूमधून ‘एडिट’ हा पर्याय निवडावा लागेल, अशी माहिती कंपनीने ब्लॉग पोस्टमध्ये दिली आहे. चुकीचे शब्दलेखन दुरुस्त करणे आणि योग्य माहिती पोहोचवणे हाच एक उद्देश असल्याचं कंपनीने सांगितलंय.

हेही वाचा :  तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? ‘या’ पोर्टलच्या मदतीने मिनिटात मिळेल सर्व माहिती

आणखी वाचा – Google वर काय सर्च करता तुम्ही? सेकंदात करा डिलीट, कोणालाच समजणार नाही…

दरम्यान, व्हॉट्सअॅपने अलीकडेच वापरकर्त्यांना काही वैयक्तिक चॅट लॉक करू देण्यासाठी एक पर्याय दिला आहे. टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या कंपन्यांनी देखील यावर ऑफर दिली होती. तर ट्विटरवर तुम्ही पैसे देऊन, ट्विट एडिट करू शकता. त्यानंतर आता व्हॉट्सअॅपने सर्वात मोठा पर्याय खुला केला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …