अँड्रॉइड युजर्सचं WhatsApp आता बदलणार, अँड्रॉइड फोनमध्ये घेता येणार आयफोनचा अनुभव

नवी दिल्ली :WhatsApp Update for Androids : अँड्रॉइड असो की आयओएस दोन्हीमध्ये मेसेज करण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणारे ॲप म्हणजे व्हॉट्सॲप. अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर युजर्सना व्हॉट्सॲपमध्ये एकसारखेच फिचर जरी मिळत असतील तरी युआय म्हणजे युझर्स इंटरफेस हा वेगवेगळा असतो. कारण आयफोनमध्ये व्हॉट्सॲपचे ऑप्शन्स जसेकी कॉल, चॅट्स,कम्युनिटीज आणि स्टेटस खाली दिसतात तर अँड्रॉइड मध्ये ते वर दिसतात. पण आता व्हॉट्सॲपमध्ये आलेल्या या नव्या अपडेटमुळे आयफोन आणि अँड्रॉइडमधील हा फरक बदलणार असून दोन्ही अगदी एकसारखं दिसणार आहे.

मेटाची मालकी असलेल्या व्हॉट्सॲपने आयओएससारखा मेन्यू अँड्रॉइड मध्ये आता उपलब्ध करून दिला आहे. Android 2.23.10.6 हे अपडेट इन्स्टॉल करणाऱ्या बीटा टेस्टर्सला हा नवा इंटरफेस दिसणार आहे. आता या नव्या इंटरफेसनुसार अँड्रॉईडमध्ये खालच्या बाजूला नेविगेशन बार दिसणार आहे. व्हॉट्सॲप अपडेट्सची माहिती देणाऱ्या WABetainfo ने देखील हे कन्फर्म केलं आहे की हा बदल करण्यासाठी व्हॉट्सॲप कंपनी मेन्यू लवकरच रिडिझाईन करणार आहे. मेटाने अशाप्रकारे अँड्रॉईड आणि आयओएस यांच्या व्हॉट्सॲपचा इंटरफेस बदलण्यामागे काही कारणं आहेत. आजकाल अँड्रॉईड फोनचा डिस्प्लेही मोठा येत असल्याने खालील मेन्यू अँड्रॉईड युजर्स आता अगदी आयफोनप्रमाणे वापरणार आहेत.

हेही वाचा :  सोनम कपूरने दाखवली ६ महिन्याच्या वायुची पहिली झलक, नव्या आईने काय आहार सुरू करावा

व्हॉट्सॲपचे चॅट आणखी सुरक्षित होणार
व्हॉट्सॲपचे चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी आता कंपनी खास फीचर आणत आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलचा पासवर्ड एखाद्याला माहीत असेल तरी तुमचे व्हॉट्सॲपवरचे चॅट सुरक्षित राहणार आहेत. कारण व्हॉट्सॲपने एक नवीन गोपनीय फिचर आणलं आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवर असलेले मेसेज लॉक करून ठेवू शकता. या नव्या फिचरचे नाव Chat Lock असे आहे. विशेष म्हणजे केवळ वैयक्तिकच नाही तर ग्रुप चॅट साठी सुद्धा लॉकचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे तुमचे चॅट तुम्ही एखाद्या फोल्डर मध्ये save करू शकता.

वाचा : Smartphone Care : स्मार्टफोन वापरताना चुकूनही ‘या’ चुका करू नका, नाहीतर होईल हजारोचं नुकसान

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Loksabha : ना भोंगा ना रिक्षा; पुणे तिथे ‘प्रचार’ उणे, मतदानाच्या टक्केवारीवर होणार परिणाम?

Pune Political News : ना भोंगा फिरवणारी रिक्षा, ना पथनाट्य कलावंतांचा टेम्पो.. ना रॅली ना …

कोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर? उदय सामंत म्हणाले ‘जर माझ्या मोठ्या भावाने फोटो काढला…’

कोकणातील सामंत बंधूंमधील (Samant Brothers) वाद चव्हाट्यावर आला आहे. किरण सामंत (Kiran Samant) यांच्या कार्यकर्त्यांनी …