WhatsApp Tricks : व्हॉट्सॲपची जादुई ट्रिक! समोरच्यानं डिलीट केलेला मेसेजही वाचता येणार

नवी दिल्ली :WhatsApp Tricks and Tips : आधी केवळ एक मेसेंजर ॲप असणारं व्हॉट्सॲप आता फार महत्वाचं मेसेजिंग ॲप बनलं आहे. लोक याचा वापर केवळ एकमेकांशी चॅट करण्याकरताच नाही तर व्यवसाय, कार्यालय याच्यातही करत आहेत. ज्यामुळे सद्यस्थितीला कोट्यवधी भारतीय व्हॉट्सॲप वापरत असून चॅटिंगसह, फोटो व्हिडीओ पाठवण्यापासून ते व्हिडीओ कॉलिंगसाठीही व्हॉट्सॲप वापरतात. त्यामुळे व्हॉट्सॲपच्या वेगवेगळ्या ट्रिक्सही अनेकजण वापरत असून एक अशीच भन्नाट ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर ही ट्रिक म्हणजे समजा तुम्हाला कोणीतरी मेसेज केला आणि तुम्ही वाचायच्या आधीच त्याने तो डिलीट केला तर तुम्ही सोपी ट्रिक वापरुन तो मेसेज पुन्हा मिळवू शकाल…चला तर जाणून घेऊ या ट्रिकबद्दल

सर्वात आधीतर तुम्हाला एक थर्डपार्टी ॲप डाऊनलोड करावं लागेल. “WhatsDelete: Recover Deleted Messages” नावाचे ॲप इंस्टॉल करावे लागेल. हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर, तुम्हाला सर्वप्रकारच्या परमिशन या ॲपला द्याव्या लागतील. जेणेकरून हे ॲप योग्यरित्या आपले कार्य करू शकेल.

वाचा : पहिल्या iPhone लाँचनंतर १५ वर्षांनी उघडलं भारतातील Apple Retail Store, कसा आहे हा खास प्रवास?

हेही वाचा :  WhatsApp चं स्टेटस २४ तासांनंतरही पाहता येणार, पाहा कसं असेल 'हे' खास फीचर

आणि मग डिलीट केलेले मेसेजही दिसतील…
तर हे ॲप इंस्टॉल केल्यावर तुम्हाला व्हॉट्सॲपवर काही सेटिंग्ज कराव्या लागतील. त्यासाठी आधी WhatsApp उघडा आणि त्यात वरच्या बाजूस असणाऱ्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा. सेटिंग्जवर जा आणि डेटा आणि स्टोरेज वापरावर टॅप करा. मीडिया ऑटो डाउनलोड वर जा आणि सर्व पर्यायांना परमिशन द्या. त्यानंतर जर कोणी तुम्हाला मेसेज, ऑडिओ किंवा व्हिडीओ क्लिप पाठवून ती डिलीट करत असेल, तर त्यानंतर तुम्हाला तेच ॲप उघडावे लागेल जे तुम्ही डाउनलोड केले आहे. व्हॉट्सॲप डिलीट ॲप उघडल्यानंतरच तुम्हाला डिलीट केलेला मेसेज, ऑडिओ किंवा व्हिडिओ दिसेल. तुम्ही ती मीडिया फाईल पुन्हा मिळवू देखील शकता.

वाचा :Smartphones : जबरदस्त फीचर्स सोबत स्टायलिश डिझाइनचे टॉप ५ स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …