Whatsapp चं नवीन फीचर, आता झटपट तयार करु शकता स्टिकर्स

नवी दिल्ली :WhatsApp New Features : व्हॉट्सॲप हे आता केवळ मनोरंजनाचं साधन राहिलं नसून एक गरजेचं महत्त्वाचं ॲप्लिकेशन झालं आहे. अगदी रोजच्या गप्पांपासून ते कितीतरी कार्यालयांतील महत्त्वाची कॉनवरसेशन यावरच सुरु असतात. दरम्यान व्हॉट्सॲप देखील आपल्या आपल्या युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन सतत नवनवीन फीचर्स आणत आहेत. मागील काही काळात तर बरेच अपडेट आले असून आता आणखी एक खास फीचरवर व्हॉट्सॲपची टेक टीम काम करत आहे. आता WhatsApp ने iOS वर प्रत्येकासाठी आपले ‘स्टिकर मेकर’ टूल रिलीझ करण्यास सुरुवात केली आहे.

व्हॉट्सॲप यावर्षी अनेक नवीन फीचर्स आणत आहे. गेल्या चार महिन्यांत व्हॉट्सॲप वर अनेक दमदार फीचर्स आले आहेत. आता WhatsApp ने iOS वर प्रत्येकासाठी आपले ‘स्टिकर मेकर’ टूल रिलीझ करण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्सॲपच्या अपडेट्सबद्दल माहिती देणाऱ्या Wabetainfo च्या अहवालातून स्टिकर मेकर टूल आता अधिक सुधारणांसह येत असून ते ॲप स्टोअरवरून WhatsApp चे लेटेस्ट अपडेट डाऊनलोड करणाऱ्यांसाठी आहे.

नेमकं कसं काम करेल स्टिकर मेकर टूल?
स्टिकर मेकर टूल वापरकर्त्यांना ॲपमधूनच स्टिकर्स तयार करण्यास मदत करते. यामुळे आता व्हॉट्सॲप युजर्सना दुसऱ्या थर्डपार्टी ॲप्स डाऊनलोड करण्याच्या चितेपासून दूर करतो आणि वेळेची बचत करुन थेट व्हॉट्सॲपमध्येच स्टीकर तयार करु देतो.

हेही वाचा :  Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

काही आठवड्यांत युजर्सना मिळेल हे फीचर
Wabetainfo च्या अहवालात असे म्हटले आहे की हे फीचर iOS 16 वरील सर्व वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे, परंतु iOS च्या जुन्या अपडेट्समध्ये सध्यातरी हे फीचर मिळणार नाही. तसंच अहवालात म्हटल्याप्रमाणे येत्या आठवड्यात काही ग्राहकांनाच्या फोनमध्ये हे फीचर सुरु होईल.

WhatsApp घेऊन येतंय नवनवीन फीचर्स
युजर्सच्या गरजा लक्षात घेत व्हॉट्सॲप आणखी काही फीचर्सवरही काम करत आहे. यामध्ये जास्त लेंथच्या व्हॉइस मेसेजसाठी ट्रान्सक्रिप्शन फीचर्स दिले जाणार आहे. तसेच, व्हॉट्सॲच्या व्हिडीओ कॉलिंगमध्येही भारी अपडेट्स येऊ शकतात. याशिवाय व्हॉट्सॲप ‘मेसेज युवरसेल्फ’ फीचर सुरू करू शकते. मात्र, हे फीचर्स कधीपर्यंत लागू केले जातील, याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही.

वाचाःAirtel चं सिम वापरता? ‘या’ पाच रिचार्जसोबत फ्री मिळेल हॉटस्टार किंवा प्राईम व्हिडीओचं सब्सक्रिप्शन

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …