वयाच्या ४० शीनंतर IVF शिवाय आई होणं शक्य आहे? नॅचरल कन्सिव होण्याची शक्यती किती

गर्भधारणा उशिरा होणे ही अतिशय सामान्य बाब आहे. ३५ ते ४० वयोगटातील महिलांना गर्भधारणा राहण्यास अडथळा निर्माण होतो. अनेकदा करिअर किंवा काही शारीरिक अडचणींमुळे महिलांना ३० नंतर किंवा वयाच्या ३५ व्या वर्षी गर्भधारणा राहते. मात्र महिलांचे वय वाढल्यानंतर अंडाशयाची क्वालिटी कमी होते. सामान्यपणे या वयानंतर अनेक महिलांना मेनोपॉजची सुरूवात होते. कारण ४० ते ४५ नंतर पीरियड्सशी संबंधीत अनेक समस्या उद्भवतात किंवा मासिक पाळीबाबत असंख्य बदल होतात. तसेच वयाच्या ४५ शीनंतर मेंस्ट्रुएशन्स सायकल (menstruation cycle) बंद होण्याची दाट शक्यता असते. यामुळे गर्भधारणेचे योग्य वय हे २५ ते ३० दरम्यान असते. कारण यानंतर गर्भधारणा राहिल्यास असंख्य समस्या येऊ शकतात.

अशावेळी असा प्रश्न पडतो की, वयाच्या ४० ते ४५ दरम्यान नैसर्गिक गर्भधारणा राहते शक्य आहे का? गर्भधारणा शक्य आहे का? या प्रश्नासोबत गरोदरपणाचा हा प्रवास किती शक्य आहे? वयाच्या ४५ नंतर फक्त आयव्हीएफच्या मदतीनेच आई होण्याची शक्यता असते की, नैसर्गिक पद्धतीने पण तुम्ही गरोदर राहू शकता? याबाबत या लेखात जाणून घेणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)

हेही वाचा :  वयाच्या ३८ व्या वर्षी प्रेंग्नेंट असताना मंदिरा बेदीची झाली होती ‘अशी’ अवस्था

​वयाच्या ४५ नंतर नैसर्गिक गर्भधारणा शक्य आहे का?

तज्ज्ञांच्या मते, ४० वर्षांनंतरच्या स्त्रिया पेरीमेनोपॉजच्या टप्प्यात असल्याने त्यांच्या मासिक पाळीचे दिवस मोजण्यात किंवा ओव्हुलेशनची वेळ समजण्यात समस्या येऊ शकते. अशा स्थितीत महिलांना ओव्हुलेशनसाठी औषधांची गरज भासू शकते. त्याच वेळी, काही अभ्यासांमध्ये असे सांगण्यात आले की, पाश्चात्य देशांतील महिलांच्या तुलनेत भारतातील महिलांमध्ये अंड्याच्या गुणवत्तेची घसरण ५ वर्षांपूर्वी सुरू होते.

याचा अर्थ महिलांची प्रजनन क्षमता ५ वर्षापूर्वीच कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत, ४० वर्षांनंतर, नैसर्गिकरित्या गर्भधारणेमध्ये समस्या येऊ शकतात. याशिवाय गरोदर राहिल्यानंतरही महिलांना अनेक समस्या उद्भवू शकतात. ४० ते ५० वर्षांनंतर गर्भधारणा झालेल्या स्त्रियांची गर्भधारणा ही उच्च-जोखीम असलेली गर्भधारणा मानली जाते आणि अशा परिस्थितीचा धोका वाढू शकतो.

(वाचा – या ६ गोष्टी करा आणि मुलांना स्मार्टफोन आणि टीव्हीपासून दूर ठेवा, प्रत्येक पालकांसाठी उपयुक्त टिप्स))

हेही वाचा :  Uddhav Thackeray: मला सर्वात जास्त दया भाजप कार्यकर्त्यांची येतेय; ते सतरंज्यांखाली दबलेत!

​४० शीनंतर कोणत्या समस्यांना सामोरे जातात महिला

  • सामान्य प्रसूतीची शक्यता कमी आणि सी-सेक्शनची शक्यता जास्त
  • प्री-एक्लॅम्पसियाचा धोका वाढतो. हा उच्च रक्तदाबाचा एक प्रकार आहे, जो कधीकधी प्राणघातक ठरू शकतो.
  • गर्भावस्थेतील मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
  • मुदतपूर्व प्रसूती किंवा प्री-मॅच्युअर डिलिव्हरी होण्याचा धोका वाढतो.
  • एक्टोपिक गर्भधारणेचा धोका वाढतो. या प्रकारच्या गर्भधारणेमध्ये, गर्भ गर्भाशयाच्या बाहेर विकसित होऊ लागतो मूल आणि आई दोघांसाठीही खूप गंभीर आणि प्राणघातक ठरू शकते.

(वाचा – पालकांच्या या ५ चुका मुलांना बनवतात स्वार्थी आणि जिद्दी)

​४५ वयापेक्षा अधिक असलेल्या मातांना हा होतो त्रास

  • जन्म दोष
  • वाचण्याची आणि लिहिण्याची आणि शिकण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होऊ शकते.
  • डाऊन सिंड्रोमचा धोकाही वाढू शकतो.
  • कमी जन्म वजन

(वाचा – Meta ने आईला जॉबवरून काढलं, ६ वर्षांच्या मुलीने साजरा केला आनंद, आई-मुलीचं खास नातं))

​४५ शी नंतर गर्भधारणेकरता फक्त IVF हा एकच पर्याय

-ivf-

मासिक पाळीच्या चक्राशी संबंधित समस्या वयानुसार वाढत जातात. अशावेळी नैसर्गिकरित्या गर्भधारणेमध्ये सर्वात मोठा अडथळा येऊ शकतो. अशा परिस्थितीत जर वैद्यकीय मदत किंवा औषधे घेऊनही गर्भधारणा शक्य नसेल तर महिलांना आयव्हीएफच्या मदतीने गर्भधारणा करण्याचा सल्ला दिला जातो.

हेही वाचा :  Ovulation Period म्हणजे काय? आई होण्यापूर्वी जाणून घेणे का गरजेचे

तज्ञांच्या मते, वयाच्या 45 वर्षानंतरही, IVF चे यश 100% असू शकत नाही. अशा परिस्थितीत, तुम्हाला डॉक्टरांच्या मदतीची आणि योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असेल आणि त्यानुसार तुम्ही आयव्हीएफ प्रक्रियेस पुढे जाऊ शकता.

(वाचा – तूप फक्त खाण्यासाठी नव्हे तर बाळाच्या मालिशकरताही फायदेशीर, हाडं होतील मजबूत, तर त्वचा चमकदार)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …