अमिताभ बच्चन यांनी सांगितल्या आठवणी; म्हणाले, ‘बँकेत एकही रुपया नव्हता, आर्थिक मदत करण्यासाठी ध

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असणारे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे एव्हर ग्रीन अभिनेत्यांपैकी एक आहेत. बिग बी हे त्यांच्या अभिनयानं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतात. अमिताभ हे कोट्यवधींचे मालक आहेत. लग्झरी गाड्या, कोट्यवधींचे घर अशी अमिताभ बच्चन यांची संपत्ती आहे. पण सध्या कोट्यवधींचे मालक असणारे अमिताभ बच्चन हे एकेकाळी आर्थिक अडचणींचा सामना करत होते, हे अनेकांना माहिती नसेल. बिग बी हे अडचणीत असताना धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांनी त्यांना आर्थिक मदत करण्याची ऑफर दिली होती. अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं होतं. 

अमिताभ बच्चन करत होते आर्थिक अडचणींचा सामना 

अमिताभ बच्चन यांनी 1990 च्या सुमारास ‘अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड’ या व्यवसायाची सुरुवात केली परंतु अखेरीस हा व्यवसाय ठप्प झाला आणि त्यांच्यावर खूप कर्ज झाले. त्यावेळी बच्चन यांना दिवंगत धीरूभाई अंबानी यांनी आर्थिक मदतीची ऑफर दिली होती परंतु ही ऑफर बिग बींने नाकारली. 2017 च्या एक व्हिडीओ ब्रुट इंडियानं त्यांच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी सांगितलं होतं, “माझ्या आयुष्यात एक वेळ अशी होती जेव्हा मी आर्थिक अडचणीत होतो. दिवालिया हो गया”

हेही वाचा :  Heropanti 2 : ‘बबलू’ बनून टायगर श्रॉफ दाखवणार हीरोपंती! ‘या’ दिवशी रिलीज होणार धमाकेदार ट्रेलर

“माझ्यावर करोडोंचे कर्ज होते. उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद करून माझ्या घरावर सरकारने छापा टाकला. माझ्या वैयक्तिक बँक अकाऊंटमध्ये एकही रुपया नव्हता. धीरूभाईंना याबाबत कळाले. कुणालाही न सांगता त्यांनी त्यांचा धाकटा मुलगा आणि माझा जिवलग मित्र अनिल यांना सांगितले की, ‘तो वाईट काळातून जात आहे, त्याला थोडे पैसे द्या’ .त्यांना जी रक्कम द्यायची होती त्याने माझे सर्व प्रश्न सुटले असते. पण मला वाटले की मी त्यांची पैसे स्वीकारू शकणार नाही, ” असंही अमिताभ बच्चन यांनी सांगितलं. 

 केबीसी सारख्या कार्यक्रमांसोबतच बिग बी हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. काही दिवसांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले. तसेच अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.आता बिग बी हे प्रभासच्या नव्या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आागमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

News Reels

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Kaun Banega Crorepati: ‘कौन बनेगा करोडपती- 14’ घेणार प्रेक्षकांचा निरोप; बिग बींनी व्यक्त केल्या भावना

हेही वाचा :  YOGI 2.0 : योगी आदित्यनाथ यांचा उद्या शपथविधी सोहळा, अंबानी-अदानींपासून बॉलिवूडपर्यंत 'या' दिग्गजांना निमंत्रण

 

 

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …