Ovulation Period म्हणजे काय? आई होण्यापूर्वी जाणून घेणे का गरजेचे

आई होणं हा जगातील सर्वात सुखद अनुभव आहे आणि त्यासाठी प्रत्येक महिलेला Ovulation Period बाबत माहिती करून घेण्याची गरज आहे. अनेकदा हा शब्द कानावरून जातो. मात्र नक्की काय याबाबत फारच कमी जणांना माहिती असते. ओव्ह्युलेशन हा महिलांच्या मासिक पाळीचाच एक भाग आहे. अंडाशयातून अंडी बाहेर येण्याच्या प्रक्रियेला ओव्ह्युलेशन काळ म्हटले जाते. साधारण १२ ते २४ तास अंडे फर्टिलायझेशनसाठी थांबते आणि त्यानंतर Sperms द्वारे फर्टिलायझेशन होत नाही.

दुसऱ्या बाजूला रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅकमध्ये स्पर्म ५ दिवस टिकून राहतात. यादरम्यान जोडीदारासह इंटरकोर्स करणे गरजेचे असते ज्यामुळे बाळाला जन्म देता येईल. यासाठी काही योजना आणि कॅलक्युलेशनची गरज भासते. यामुळे तुम्हाला Fertile Period बाबत कळते. याबाबत अधिक माहिती प्रसूतीतज्ज्ञ डॉ. श्रीकांत पाटील यांच्याकडून आम्ही माहिती घेतली. (फोटो सौजन्य – iStock)

​सर्वात जास्त Fertile Days​

-fertile-days

साधारणतः सर्वाधिक फर्टाइल दिन हा मासिक पाळीच्या आठव्या दिवशी आणि त्याच चक्रानुसार १९ व्या दिवसाच्या दरम्यान मोजले जातात. यामध्ये तुमच्या मासिक पाळीचा पहिला दिवस हा फर्टाइल चक्राचा पहिला दिवस मानला जातो. अर्थात हे प्रत्येक महिलेमध्ये वेगवेगळे असते.

हेही वाचा :  Sushama Andhare: भर सभेत सुषमा अंधारे यांचा अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट; राजकारण ढवळून निघण्याची शक्यता

​ओव्ह्युलेशन काळ किती दिवसांचा?​

​ओव्ह्युलेशन काळ किती दिवसांचा?​

मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी १० ते १६ दिवस आधी ओव्ह्युलेशन काळ सुरू होतो. जर एखाद्या महिलेचा मासिक पाळीचा काळ २८ दिवसांचा असेल तर हे गणित अधिक सोपे होते. यामुळे Ovulation Planning करून गर्भधारणेची संभावना अधिक वाढते.

(वाचा – प्रेग्नन्सीदरम्यान जास्त तूप खाणे धोकादायक? किती प्रमाणात करावे सेवन)

​ओव्ह्युलेशन लक्षणे​

​ओव्ह्युलेशन लक्षणे​

Ovulation Symptoms: अनेक महिलांना ओव्ह्युलेशनची लक्षणे असतात याचीच कल्पना नसते. मात्र व्हजायनल डिस्चार्ज, शरीराचा तापमान कमी जास्त होणे, छाती सुजणे, पोटात दुखणे इत्यादी लक्षणावरून ओव्ह्युलेशन पिरियड चालू झाला आहे हे कळते. तसंच सर्वात सोपे लक्षण म्हणजे खाण्याचे प्राधान्य बदलते आणि महिलांना अधिकाधिक जास्त मीठ असणारे पदार्थ खावेसे वाटतात.

(वाचा – गर्भावस्थेदरम्यान पायाला सूज का येते? या घरगुती उपायांनी मिळवा आराम)

​रिसर्चमध्ये काय सांगण्यात येते​

​रिसर्चमध्ये काय सांगण्यात येते​

इंडियन जर्नल ऑफ फिजिओलॉजी अँड फार्मोकॉलॉजीने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, मासिक पाळीत होणाऱ्या हार्मोन्स बदलासह महिलांना अधिक मिठाचे पदार्थ खावेसे वाटतात. वास्तविक या काळामध्ये कोणत्याही महिलेला अधिक क्रेव्हिंग्ज होताना दिसून येतात. ओव्ह्युलेशननंतर यामध्ये वाढ होते.

हेही वाचा :  होळीचे रंग आणि Chronic Obstructive Pulmonary Disease

(वाचा – सोनम कपूरला व्हायचंय आपल्या सासूसारखी आई, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत व्यक्त केली इच्छा)

​फर्टाइल विंडो आणि ओव्ह्युलेशन​

​फर्टाइल विंडो आणि ओव्ह्युलेशन​

ज्या काळात गर्भधारणा होण्याची जास्त शक्यता असते त्या काळाला फर्टाइल विंडो असं म्हटलं जातं. साधारणतः ३ दिवस स्त्री च्या शरीरात स्पर्म क्रियाशील राहातात. बीजांडाचं आयुष्य हे केवळ एक दिवसाचं अर्थात २४ तासापुरतंच मर्यादित असतं. त्यामुळे बाळासाठी प्रयत्न करत असल्यास योग्य कालावधी ठरतो तो ओव्ह्युलेशनच्या आधी ३-४ दिवस ते ओव्ह्युलेशननंतरचे दोन दिवस इतकाच.

​शारीरिक आरोग्य महत्त्वाचे ​

​शारीरिक आरोग्य महत्त्वाचे ​

यशस्वीपणे गर्भधारणा होणे हे प्रत्येक स्त्री आणि पुरूषाच्या निरोगी आरोग्यावरीही अवलंबून असते. ओव्ह्युलेशन काळ आणि त्यासह मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी असणेही गरजेचे आहे. त्यामुळे ओव्ह्युलेशनबाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून योग्य सल्ला घेऊन बाळाचा विचार करावा.

टीप – ही माहिती डॉक्टरांकडून घेऊन देण्यात आली आहे. मात्र प्रत्येक महिलेचे शरीर आणि ओव्ह्युलेशन काळ वेगळा असतो त्यामुळे अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधून सल्लामसलत करावी.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …