Coronavirus Fourth Wave: भारतात Corona ची चौथी लाट सुरू झाली? काय म्हणाले AIIMS चे संचालक

coronavirus outbreak 2022 : चीन, अमेरिका आणि जपानसह अनेक देशांमध्ये कोरोनाची नवी लाट आली आहे. (corona update) या देशांमध्ये संसर्ग झपाट्याने वाढत आहे. याचपार्श्वभूमीर भारतात (India Corona) अलर्ट जारी केला असून  भारतात सध्या संसर्ग नियंत्रणात आहे. परंतु आकडेवारीनुसार एका आठवड्यात नवीन प्रकरणांमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत भारतात चौथी लाट सुरू झाली आहे का? असा प्रश्न पडतो.

आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, भारतात एका आठवड्यात कोरोनाच्या (coronavirus) प्रकरणांमध्ये 14 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहेय. यामध्ये 13 ते 19 डिसेंबर दरम्यान देशभरात कोरोनाचे 1,104 रुग्ण आढळले आहेत. तर 20 ते 26 डिसेंबर दरम्यान 1,260 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

मात्र, 13 ते 19 डिसेंबर दरम्यान 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच वेळी, 20 ते 26 डिसेंबर दरम्यान 19 मृत्यू झाले आहेत. मात्र, या मृत्यूंच्या आकडेवारीत काही जुन्या मृत्यूंचाही समावेश आहे. कारण केरळमध्ये जुन्या मृत्यूंचा समावेश आहे. तर 22 डिसेंबर रोजी 9 मृत्यू झाले होते. परंतु यापैकी 6 मृत्यू जुने होते. म्हणजेच, ते यापूर्वी घडले होते परंतु नंतर त्यांची गणना कोविड मृत्यूमध्ये करण्यात आली. एवढेच नाही तर देशात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येतही किंचित वाढ झाली आहे. 22 डिसेंबरपर्यंत, सक्रिय प्रकरणांची संख्या 3,380 होती, जी 26 डिसेंबरपर्यंत 3,421 झाली.

हेही वाचा :  Frozen Sperm च्या मदतीने Pregnant झाली शेळी, शास्त्रज्ञांना मिळाले मोठे यश

वाचा : मृतदेहांचा खच उचलण्यासाठी भरती; चीनमध्ये कोरोनाच्या विळख्यात मन घट्ट करून लोक कतायत ‘ही’ कामं

चौथी लाट येणार का?

भारतात सध्या चौथ्या लाटेचा धोका नाही. चौथ्या लाटेची व्याप्ती कमी असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे. याचे कारण म्हणजे भारतातील 90 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येमध्ये कोरोनाविरुद्ध प्रतिकारशक्ती आहे. तरीही दक्षता वाढवण्यात आली आहे. एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नुकतेच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, प्रकरणे वाढली तरी ती सौम्य असतील आणि लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची फारशी गरज भासणार नाही. तसेच ओमिक्रॉनच्या सब-व्हेरिएंट BF.7 मुळे रुग्णालयात दाखल होणार नाही किंवा मृत्यूची संख्या वाढणार नाही. कारण आता प्रतिकारशक्ती खूप वाढली आहे.

पुढे म्हणाले की BF.7 जुलैमध्ये भारतात आले होते. परंतु आम्ही पाहिले की यामुळे रुग्णालयात दाखल होत नाही किंवा मृत्यूही वाढले नाहीत. डॉ. गुलेरिया असे मानतात की, हा प्रकार दीर्घकाळ टिकू शकतो, पण त्यातून नवीन लाट अपेक्षित नाही. 

राज्य सरकारकडून खबरदारी

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला अलर्ट केले आहे. राज्य पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आले आहे. टेस्टिंग आणि लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय परदेशातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावर कोरोना चाचणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.  तसेच तालुका पातळीपासून ते महानगर पालिकेतील सर्व आरोग्य यंत्रणांना खबरदारी घेण्याच्या आणि सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

हेही वाचा :  Women’s Premier League : पहिल्या हंगामात पाच संघाचा सहभाग, अहमदाबादला अदानी यांनी केलं खरेदीSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज …

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …