असे सजवाल घर, तर हवा राहील खेळती – सिद्धार्थने शेअर केलेला घराचा व्हिडिओ पाहा!

प्रत्येकाचं आपलं घर असावं हे स्वप्नं असतंच आणि त्यासाठी पैशांचा संचय करून आयुष्यभर काम केलं जातं. घर घेतल्यानंतरचा आनंद आणि आपलं हे घर कसं सजवायचं यासाठी अनेकदा चर्चा केल्या जातात. पण भरभरून काही करण्यापेक्षा अत्यंत साधं आणि तरीही Eye-Catching अर्थात डोळ्याला सुखद वाटणारे असे रंग, उत्तम रंगसंगतीचे पडदे, बेडरूममध्ये सुटसुटीत फर्निचर, फोटो फ्रेम्स याचे एक वेगळेच गणित असते. तुम्ही घर घेतल्यानंतर तुम्हाला जर होम डेकॉर कसे करावे कळत नसेल तर सध्या लक्ष वेधून घेतोय तो अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या घराचा व्हिडिओ. सिद्धार्थने आपल्या घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून घर कसे सजवावे याची एक उत्तम कल्पना दिली आहे. काय आहे बोहेमन डेकॉरचं खास वैशिष्ट्य आणि कसे सजवू शकता घर जाणून घेऊया.

डोळ्याला सुखावणारे भिंतींचे रंग

घर सजविण्याची सुरूवात होते ती म्हणजे रंगांपासून. बेडरून, हॉल, किचन यामधील भिंतींना देण्यात येणारे रंग हे आकर्षक आणि तितकेच डोळ्यांना सुखावणारेदेखील असावे. यासाठी गडद रंगापेक्षा फिकट निळा, हिरवा, ऑफ व्हाईट या रंगाची निवड नक्कीच उपयुक्त ठरते. विशेषतः हॉलसाठी ऑफ-व्हाईट रंग हा अधिक चांगला दिसतो. तर बेडरूमसाठी टरकॉईज निळा, हिरवा हा रंग आजकाल अधिक ट्रेंडमध्ये आहे. विशेषतः पेस्टल रंगांनाही अधिक प्राधान्य देण्यात येते. ज्यामुळे घरात हवा खेळती राहण्यास मदत मिळते.

हेही वाचा :  मरीन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर फक्त 8 मिनिटात कापता येणार; कोस्टल रोडच्या उद्घाटनाबाबत उदय सामंत यांची मोठी घोषणा

सिद्धार्थ केला घराचा व्हिडिओ शेअर, असं सजवा घर

पडद्यांची रंगसंगती

अति गडद पडदे कधीही घरात चांगले दिसत नाही. तसंच पडद्यांची निवड करताना ते अधिक जड नाहीत आणि वेळोवेळी काढून त्याची स्वच्छता नीट होऊ शकते की नाही याची काळजी घ्यावी. पडदे किमान १५ दिवसांनी धुवायला हवेत. यामुळे हवा खेळती तर राहतेच शिवाय घरात आजारी पडू नये यासाठी ही काळजी घ्यावी. तसंच घरातील रंगांचा विचार करूनच पडद्यांचा रंगही ठरवावा. अति पातळ अथवा अति जाड पडदे वापरू नयेत. यामुळे घरातील पडदे दिसायलाही सुंदर दिसतात.

(वाचा – चहाचे गाळणे काही केले तरी काळेकुट्टच? हट्टी डाग काढून टाकण्यासाठी या टिप्स फॉलो करा)

फोटो फ्रेम्स आणि ड्रीम कॅचर

हॉल अथवा गॅलरी असल्यास, आपल्या लग्नातील, बाळाच्या जन्माच्या वेळेचे फोटो निवडून त्याच्या रॅक्टँगल फ्रेम्स करून घ्याव्या. या फोटो फ्रेम्स भिंतीवर न लावता तुम्ही लाकडी फर्निचर ठेवावे आणि त्यावर ठेवाव्यात. भिंतीवर लावतानाही सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या ग्लास फ्रेम्सचा वापर करावा. ज्यासाठी खिळे ठोकण्याची गरज भासत नाही. तर हॉल आणि गॅलरीच्या भिंतीवर ड्रीम कॅचर आणि काही सकारात्मक विचारांच्या फ्रेम्स लावल्यास अधिक आकर्षक दिसते. बाजारात असे सुविचार असणाऱ्या फ्रेम्स सध्या उपलब्ध आहेत. याशिवाय दाराबाहेर लागणाऱ्या आडनावाच्या पाटीची फ्रेम तुम्ही रेक्टँगल ठेवलीत तर छान दिसते.

हेही वाचा :  मुलं टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये अडकलंय, अशावेळी पालकांनी काय कराव? त्यांना बोलण्याचा अधिकार आहे का?

(वाचा – या 3 सोप्या पद्धतीने घरीच बनवा गणपतीची मूर्ती)

बेडरूम आणि हॉलमध्ये इनडोअर प्लांट्सचा पर्याय

इनडोअर प्लांट्स हे तुमच्या घराची शोभा वाढविण्यास मदत करतात. बेडरूम आणि हॉलमध्ये तुम्ही इंडोअर प्लांट्स लावावे आणि याशिवाय तुमची गॅलरी मोठी असल्यास, तिथे स्टील अथवा स्टायलिश जिन्याच्या पद्धतीचा स्टँड वापरून त्यावर इनडोअर प्लांट्स सजवावे. यामुळे घरात सकारात्मकता राहते आणि त्याशिवाय घराची शोभा वाढण्यास याचा फायदा मिळतो. तसंच हॉलमध्ये सोफ्याच्या बाजूला एखादा मोठा इनडोअर प्लांट ठेवल्यास, अधिक उठावदार दिसते. सोफ्याचा रंग निळा वा राखाडी असल्यास, ही रंगसंगती अधिक उत्तम दिसते.

(वाचा – घरच्या घरी असं बनवा सुगंधी व झटपट एअर फ्रेशनर, घरातील वातावरण कायम राहील ताजतवानं व पॉझिटिव्ह)

HOME DECOR (5)

home-decor-5



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त …