मुलं टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये अडकलंय, अशावेळी पालकांनी काय कराव? त्यांना बोलण्याचा अधिकार आहे का?

प्रत्येक पालक आपल्या मुलांना आपुलकीने आणि प्रेमाने वाढवतात. अशावेळी त्या मुलाला जोडीदाराकडून चुकीची वागणुक मिळत असेल, तर पालकांना याचा प्रचंड त्रास होतो. कारण आपलं मुलं नात्यात खुश नाही, ही भावनाच पालकांना सहन होत नाही. या परिस्थितीत पालक खूप हतबल होतात. त्यांना खूप असह्य वाटत असतं. कारण या सगळ्या नात्यात ते बोलूही शकत नाहीत आणि जे घडतंय ते पाहूही शकत नाही. अशावेळी पालकांनी मुलांशी संवाद साधणं गरजेच असतं. कारण पालकांचा अशा नात्यातील अनुभव हा जास्त असल्यामुळे मुलांना मार्गदर्शन करू शकतात. कारण अशा टॉक्सिक रिलेशनशिपमधून बाहेर पडणे अत्यंत गरजेचे आहे.

तुम्हाला इथे हे समजून घ्यायचे आहे की नातेसंबंधातील गैरवर्तन अजिबात चांगले नाही. जोडीदारासोबत चुकीची वर्तणूक करणे ही अयोग्य गोष्ट आहे. मग ते शारीरिक असो किंवा मानसिक या सगळ्याचा मुलांना त्रास होत असतो. भावनिक, शाब्दिक आणि लैंगिक शोषण हे देखील वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार आहेत. जे तुम्ही तुमच्या मुलासोबत होताना पाहू शकत नाही. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

हेही वाचा :  'शिवसेना-भाजपाचं अडीच-अडीच वर्ष CM पद ठरलेलं पण पवारांनी..'; खळबळजनक खुलासा

​अब्युझिव्ह म्हणजे चुकीच वर्तणूक म्हणजे काय?

जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी क्रूर आणि हिंसक पद्धतीने वागत असेल तर हे गैरवर्तन आहे. हे शारीरिक हिंसा किंवा शाब्दिक अत्याचाराच्या स्वरूपात असू शकते. ज्यामुळे एखाद्याचे नुकसान होऊ शकते आणि भावनिक ताण येऊ शकतो.

(वाचा – वडील असूनही ते नसल्याचं भासवणं, त्यांच्याशी संपर्क न ठेवणं..श्रद्धा वालकर प्रकरणावरून पालकांनी काय शिकावं?)

​जोडीदाराला ओळखू शकत नाही

बर्‍याच प्रसंगी, आपण गैरवर्तन ओळखू शकत नाही. विशेषत: जर हे वर्तण शारीरिक नसेल तर आपल्याला वाटते की ते सहन करणे सोपे आहे. आपण हे समजण्यात अपयशी ठरतो की, ताणलेले नाते एखाद्या व्यक्तीला आतून दुखावू शकते. ती व्यक्ती आतून कोलमडू शकते. शारीरिक, लैंगिक, शाब्दिक, भावनिक, आर्थिक इत्यादींसह विविध प्रकारचे अत्याचार देखील आहेत. ज्याचा परिणाम त्या व्यक्तीवर होत असतो.

(वाचा – आलिया भट्टला मुलीकरता आवडलं ‘हे’ नाव, तुम्हालाही वाचून होईल अतिशय आनंद)

​मुलांमध्ये दिसतात बदल

पालकांच्या नात्यात दुरावा असेल तर त्याचा परिणाम मुलांवर होतो. अनेकदा पालकांच्या टॉक्सिक रिलेशनशिपचा परिणाम मुलांवर होत असतो. याचे बदल मुलांमध्ये दिसतात. त्यामुळे पालकांनी आपल्या नात्याचा परिणाम मुलांवर होऊ याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा :  Nysa आणि Yug यांना Ajay Devgan ला द्यायचंय असं आयुष्य, या पद्धतीच्या पॅरेंटिंगच्या अगदी विरोधात

(वाचा – ‘मुलीच्या जन्मापेक्षा जगात दुसरा कोणताच आनंद नाही’ अक्षयची भावूक पोस्ट, मुलीला बाबाकडून हव्या असतात या 6 गोष्टी)

​काय आहेत याचे संकेत

तणाव, चिंता आणि अस्वस्थता, आवडत्या गोष्टींमधून माघार घेणे, जास्त आंदोलने, कुटुंब आणि प्रियजनांपासून दूर जाणे, जोडीदाराच्या उल्लेखाची भीती. यासारख्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हे यामागचे संकेत आहेत.

(वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स)

​जोडीदारात दिसतात हे संकेत

तुमच्या मुलाच्या जोडीदारातील गैरवर्तनाची काही चिन्हे म्हणजे वर्तन नियंत्रित करणे, मत्सर, इतरांना दोष देणे, अतिसंवेदनशीलता, सहज राग येणे, वारंवार उद्रेक होणे.

(वाचा – एबी डिविलियर्सच्या मुलाचं भारतीय नाव, प्रत्येकजण करतंय या नावाचं कौतुक?)

​मुलांशी संवाद साधा

तुम्हाला तुमच्या मुलामध्ये काही विचित्र चिन्हे किंवा लक्षणे दिसल्यास, तुम्ही सर्वप्रथम त्याच्याशी बोलणे आवश्यक आहे. तुम्हाला त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा पूर्ण अधिकार आहे .कारण तुम्ही त्याला हे जीवन दिले आहे. गैरवर्तन तुमच्या मुलासाठी अत्यंत क्लेशकारक असू शकते आणि तुमची मदत आणि काळजी त्यांना त्यावर मात करण्यात मदत करू शकते.

हेही वाचा :  श्रद्धासारखं तुम्हीसुद्धा टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहात का?

(इंग्रजीत हे आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

होरपळ! आठवड्याच्या शेवटी उन्हाचीच बॅटिंग; सुट्ट्यांच्या दिवशी घराबाहेर पडण्याचा विचारही नकोच

Maharashtra Weather News : राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अकाळी पावसाचा मारा …

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …