Nysa आणि Yug यांना Ajay Devgan ला द्यायचंय असं आयुष्य, या पद्धतीच्या पॅरेंटिंगच्या अगदी विरोधात

अजय देवगण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी बोलतो. पण जेव्हा तो बोलतो तेव्हा तो आपल्या मुलांचा उल्लेख नक्कीच करतो. अजयला एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुले आहेत. अजयचं वडिलांप्रमाणे आपल्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम आहे. अजयही त्याच्या मुलगी नायसाबद्दल खूप सकारात्मक आहे. एका मुलाखतीदरम्यान अजयने त्याच्या पालकत्वाविषयी काही गोष्टी सांगितल्या होत्या. ज्याचा इतर पालकांना खूप उपयोग होऊ शकतो.

अजय स्टार असेल पण तो घरात मुलांसाठी मात्र इतर वडिलांप्रमाणे अतिशय सामान्य बाबांसारखा राहतो. अजयचा असा विश्वास आहे की, कठोर आणि कडक शिस्तीचा पालकत्व हा जुन्या पद्धतीचा मार्ग होता. आता पालक आणि मुलांमध्ये मैत्रीपूर्ण दृष्टीकोन आहे. आपल्याला अनेकदा अजय त्याच्या मुलांसोबत अतिशय मोकळेपणाने वावरताना दिसतो.

अजय म्हणतो की, आज पालकत्व हे पूर्णवेळ पॅशन आहे. आपण आपल्या मुलांचे संरक्षण केले पाहिजे. परंतु मुलांशी मैत्री देखील केली पाहिजे. चांगले संस्कार त्यांच्यात रुजवले पाहिजेत आणि त्यांना शिस्तीत ठेवणेही आवश्यक आहे. आजच्या पालकत्वात काटेकोरपणा असं काही नाही. अजय सांगतो की, लहानपणी त्याचे वडील कडक स्वभावाचे होते. त्यांच्या कठोर असण्यामागील कारण मला माहीत आहे. काजोलच्या आई-वडिलांनी तिची खूप छान काळजी घेतली आहे. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

हेही वाचा :  जंगली रम्मी खेळून तुम्ही किती पैसे कमवले? हे महाराष्ट्रातील बेरोजगारांना सांगा; अजय देवगणला पत्र

खूप गप्पा मारतात

अजय सांगतो की, तो त्याच्या मुलांशी खूप गप्पा मारतो. काजोल आणि अजय या दोघांनी मिळून मुलांना योग्य आणि अयोग्य यातील फरक शिकवला आहे. मुले चुका करू शकतात आणि कधीकधी ते तुम्हाला नाकारू शकतात. असे झाल्यावर तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित बोललं पाहिजे.

(वाचा – चर्चा तर होणार! एकाचवेळी गायिकेनं केलं जुळ्या मुलांना स्तनपान, Bollywood Mom ने सांगितलं Breast Feeding चं महत्व))

​कायमच जमिनीवर राहतो

त्याच्या पालकत्वाबद्दल अजयने सांगितले की, तो आणि काजोल त्यांचे सेलिब्रिटी स्टेटस सोडून मुलांशी वावरतात. दोघांचीही इच्छा आहे की, त्यांच्या मुलांनीही जमिनीवर राहावे. मुलांना सेलिब्रिटी असण्याचा कोणताच गैरफायदा अजय घेऊ देत नाही.

(वाचा – मुलांनी उत्तम यश संपादन करावं असं वाटतंय? सद्गुरू वामनराव पै यांनी सांगितलेल्या उत्कर्षाच्या 7 पायऱ्या फॉलो करा)

​सोशल मीडिया एक्सपोजर

आता लहान वयातच सोशल मीडियामुळे स्टार किड्स लाइमलाइटमध्ये येऊ लागले आहेत. यावर अजय म्हणतो की, नायसा तिचे फोटो ऑनलाइन पोस्ट करते आणि आता काळ बदलला आहे, तुम्ही त्यात काहीही करू शकत नाही. सोशल मीडिया ही आजची गरज आणि ट्रेंड आहे. सगळी मुलं सोशल मीडिया वापरत असताना माझ्या मुलांनी त्यापासून दूर का राहावं.

हेही वाचा :  Cold Wave In Maharashtra: महाराष्ट्रात थंडीची लाट येणार; पुणे वेधशाळेचा इशारा

(वाचा – घटस्फोटाचा निर्णय मागे घेणाऱ्या धनुषच्या मुलांची नावे माहित आहेत? आतापर्यंत अशी नावे कुठेच ऐकली नसतील)

​योग्य मार्गावर चालणे

अजय आपल्या मुलांना एकच सल्ला देतो की, त्यांनी या बदलत्या काळात योग्य ते काम करून योग्य व्यक्ती बनले पाहिजे. इतरांचा आदर करा आणि तुमचा स्वाभिमान जपायला शिका.

(वाचा – सतत लघवीला येणं, स्तनांना सूज हे Early Pregnancy Symptoms, मासिक पाळी येण्याआधीच मिळेल Good News)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …