Nysa Devgan : अजय देवगणच्या लेकीचा बॉयफ्रेंड? न्यासासोबत फोटोमध्ये दिसणारा तरुण कोण आहे?

Nysa Devgan Rumored Boyfriend : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) आणि अभिनेत्री काजोल (Kajol) यांची लेक न्यासा देवगण (Nysa Devgan) न्यू इयर पार्टीमध्ये मित्रांसोबत दुबईमध्ये मज्जा करताना दिसली. यामधील एका तरुणाची न्यासासोबतची जवळीक प्रचंड चर्चेत आहे. न्यासा देवगणअलिकडे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. न्यासा देवगण प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक आहे. न्यासाचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. न्यू इअर पार्टीतील अजय देवगणच्या लेकीचा बोल्ड लूक सध्या मीडियावर व्हायरल होत आहे. 

न्यू इअर पार्टीतील न्यासाचे फोटो व्हायरल 

अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण सध्या 19 वर्षांची आहे. न्यासा न्यू इअर सेलिब्रेशनच्या व्हायरल फोटोंमध्ये ती तिच्या मित्रमंडळींसोबत दिसत आहे. या फोटोमध्ये एका तरुणासोबतचे न्यासाचे फोटो चर्चेत आहेत. पोपटी रंगाच्या शर्ट घातलेला हा तरुण न्यासाचा बॉयफ्रेंड आहे की काय अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. न्यासा या तरुणाला डेट करत असल्याची चर्चा आहे. हा तरुण अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांचा जावई आहे का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

हेही वाचा :  67 व्या वाढदिवसाला Anupam Kher यांची खास पोस्ट, फिट बॉडी पाहून चाहते आश्चर्यचकित!

न्यासाचे पार्टीतील व्हायरल फोटो येथे पाहा.

न्यासा देवगण दुबईत तिच्या जिवलग मित्रांसोबत नवीन वर्ष साजर करून नुकतीच मुंबईमध्ये परतली आहे. दुबईतील सेलिब्रेशनचे फोटो न्यासाने सोशल मीडियावर शेअर केले. यामध्ये मित्र ओरहान अवत्रामणी, तानिया श्रॉफ आणि वेदांत महाजन यांच्यासोबत दिसत आहे. दरम्यान या फोटोंमध्ये सर्वांचा लक्ष वेधलं आहे ते न्यासाचा मित्र औरी (Orry) म्हणजे ओरहान अवत्रामणी यांच्यासोबतच्या फोटोंनी. ओरीसोबत न्यासाचे फोटो सध्या चर्चेत असून हा न्यासाचा बॉयफ्रेंड असल्याची चर्चा आहे.


 

कोण आहे न्यासासोबत दिसणारा ‘हा’ तरुण?

दरम्यान, औरी (Orry) म्हणजे ओरहान अवत्रामणीचे (Orhan Awatramani) जान्हवी कपूर, सारा अली खान, न्यासा देवगण आणि अनेक स्टार आणि स्टार किड्यसोबतचे फोटो नेहमी व्हायरल होत असतात. औरीच्या सोशल मीडियावर सर्व सेलिब्रिटींसोबतचे फोटो दिसून येतील. 

कोण आहे ओरहान अवत्रामणी?

ओरहान अवत्रामणी (Orhan Awatramani) ला औरी (Orry) नावाने ओळखले जाते. औरी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. औरी सारा अली खान आणि इतर अनेक स्टार किडचा वर्गमित्र आहे. याआधी ओरहान अवत्रामणी जान्वही कपूरचा बॉयफ्रेंड असल्याची चर्चाही सुरु होती.

हेही वाचा :  शुभमनला क्रिकेटच्या मैदानावर पाहताच चाहत्यांकडून साराच्या नावाच्या घोषणा

‘हा’ आहे अजय देवगणच्या लेकीचा बॉयफ्रेंड? 

ओरहान अवत्रामणी न्यासा आणि इतर अनेक स्टार किड्सचा चांगला मित्र आहे. त्याचे न्यासा आणि इतरांसोबतचेही अनेक फोटो चर्चेत येत असतात. औरी न्यासाचा बॉयफ्रेंड असल्याची केवळ चर्चा आहे. याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …