मुंबईतील गृहिणीने अगदी घरगुती जेवणाच्या मदतीने ५ महिन्यात तब्बल ४० किलो वजन केलं कमी

मुंबईतील शाईस्ता मुस्तफा या गृहिणीला लठ्ठपणामुळे खूप समस्या जाणवत होत्या. अनेक त्रासाशी सामना केल्यानंतर 5 महिन्यांत 40 किलो वजन कमी केले. इतर अनेक डाएट ट्राय करूनही शाईस्ताला फार काही फरक जाणवत नव्हता. तेव्हा तिने वजन कमी करण्यासाठी रिहाना कुरेशी ज्या प्रमाणित डाएटिशियन असून गेट फिट विथ रिहानाच्या संचालिका आहेत, त्यांच्याशी संवाद साधला. शाईस्त यांच मुख्य उद्दिष्ट फक्त वजन कमी करणे नसून कंट्रोलमध्ये ठेवणे असे आहे. कारण तिच्या आधीच्या बहुतेक अनुभवांमध्ये थोड्या काळासाठी वजन कमी करते आणि ते परत ठेवते. या सगळ्याचा मानसिकदृष्ट्याही तिच्यावर परिणाम होऊ लागला होता. कारण तिने फिट होण्याचे तिचे ध्येय जवळजवळ सोडले होते. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​टर्निंग पॉईंट

शाईस्ताने वजन कमी करण्याचे विविध वर्कआऊट, डाएट वापरून पाहिले पण तिचे वजन कमी झाले नाही ते जवळपास 108 किलो होते. त्यामुळे नवीन डाएट किंवा इतर कोणतीही गोष्टी सुरू करताना ती सुरुवातीला थोडी घाबरली होती. या सगळ्या प्रवासातील टर्निंग पॉइंट म्हणजे जेव्हा ती रिहानाला डाएट काउंसिलिंगसाठी भेटली. रिहानाने सुरूवातीला शाईस्ताचं काय चुकलं हे सांगितलं आणि त्याबद्दल तिची जागृकता वाढवली. तिला वजन कमी करण्याबद्दल वास्तववादी अपेक्षा ठेवण्यास मदत केली.

हेही वाचा :  लठ्ठपणामुळे नसांमध्ये जमा झाले घाणेरडं Cholesterol, 82 किलोच्या बँकरने 5 महिन्यात केलं जबरदस्त Weightloss

​डाएट

शाईस्ताने तिच्या शरीराच्या प्रकारानुसार डाएट कस्टमाइज करून घेतला. संतुलित मॅक्रोन्यूट्रिएंट प्रोफाइलसह साधे घरगुती अन्न समाविष्ट केले. तिची चरबी कमी करण्यासाठी आणि वजन लवकर कमी करण्यासाठी तिने आठवड्यातून 3 वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग, आठवड्यातून 3 वेळा कार्डिओ केले.

​फिटनेस सिक्रेट

सातत्य हीच वजन कमी करण्याची गुरुकिल्ली आहे. शाईस्ता यांच्या मते, योग्य डाएट आणि व्यायाम अतिशय महत्वाचा आहे. जे दर आठवड्याला बदलते या सगळ्याने वजन कमी होते असे नाही. आपल्या आधीच्या पिढ्यांनी तंदुरुस्तीसाठी काही फॅन्सी केले नाही. परंतु आपल्यापैकी बर्‍याच जणांनी हे विसरता कामा नये. संतुलित आहार जर आपण सातत्याने ठेवला तर वजनात नक्कीच सकारात्मक बदल पाहता येऊ शकतो.

​वजन कमी करताना कठीण वाटलेली गोष्ट

वजन कमी करताना अनेक अडचणी येतात पण सातत्य हेच यामागचं गुपित आहे. जास्त वजन असण्यामुळे इतर समस्या उद्भवतात. तसेच चयापचयाच्या समस्या देखील जाणवतात. फक्त या प्रवासात तुम्ही सातत्य ठेवणे गरजेचे आहे.

(वाचा – पोलीस उपायुक्तांनी ९ महिन्यात तब्बल ४५ वजन केलं कमी, प्रेरणादायी प्रवास सगळ्यांनाच थक्क करणारा))

​या प्रवासाने काय टाळलं

शाईस्ताने या वजन कमी करण्याच्या बाहेरचे अन्न खाणे सोडले. घरगुती आणि फक्त घरी शिजवलेले पदार्थाचे सेवन करायची. शाईस्ताने काही अनोख्या रेसिपी तयार केल्या, ज्यामुळे त्यांच वजन कमी व्हायला मदत झाली. शाईस्ताने तिची वर्कआउटची पद्धत कार्डिओ डोमिनंटवरून स्ट्रेंथ ट्रेनिंग डोमिनंट रूटीनमध्ये बदलली.

हेही वाचा :  स्वतःच्या लठ्ठपणाचा बाऊ न करता, मेडिकल स्टुडंटने कमी केलं तब्बल २० किलो वजन

(इंग्रजीत हे आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …