‘संजय राऊत ठाकरेंच्या घरी लादी पुसतात’, कार्यकर्त्याचं वाक्य ऐकताच फडणवीस म्हणाले ‘हा बोलतोय ते…’

LokSabha Election: आमच्या विरोधकांना वाटते ही ग्रामपंचायत ची निवडणूक वाटते, त्यांची तीच लायकी आहे म्हणून त्यानुसार बोलतात. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा नव्हे तर आपल्या देशाचा नेता कोण असेल आणि पुढील 5 वर्ष हा देश कुणाच्या हातात द्यायचा याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. जळगावात भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर लोकसभा भाजपा उमेदवार रक्षाताई खडसे यांच्यासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. 

“या निवडणुकीत देशात दोनच पर्याय आहेत. एकीकडे नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत. महाराष्ट्रात तर आमची मोठी युती आहे. तिथे राहुल गांधीच्या नेतृत्वात 26 पक्षांची खिचडी आहे. आपल्या युतीचं इंजिन नरेंद्र मोदी असून एकदम पॉवरफूल आहे. त्याच्यात वेगवेगळ्या पक्षाचे डबे आहेत. यात आदिवासी, शेतकरी, महिला, अल्पसंख्यांक सर्वांना जागा आहे. आणि तिकडे प्रत्येकजण स्वत:ला इजिन समजतात. तिथे बोगीच नाही. इंजिनमध्ये केवळ ड्रायव्हर बसतो. तिथे सर्वसामान्यांना जागा नसते,” असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला. 

राहुल गांधीच्या इंजिनमध्ये सोनिया आणि प्रियंका गांधी यांना जागा आहे. शरद पवार यांच्या इंजींनमध्ये सुप्रिया सुळे आहेत असं फडणवीस म्हणाले. तसं तर उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये असं बोलत असतानाच एका कार्यकर्त्याने संजय राऊत असं म्हटलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी हाताने लादी पुसताना दाखवत हे एकच आहे असं इशाऱ्यात म्हटलं. त्यावर कार्यकर्त्याने घऱ पुसायचं काम असा आवाज दिला. ते ऐकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मी नाही म्हटलं ते म्हटले असं म्हणताच हशा पिकला. यानंतर त्यांनी वाक्य पूर्ण करत उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे असं म्हटलं. 

“यांच्या इंजिनमध्ये फक्त कुटुंबाला जागा आहे. यांच्यासाठी फक्त आपलं कुटुंबच परिवार आहे, पण मोदींसाठी संपूर्ण देश परिवार आहे. शरद पवार बारामती, राहुल गांधी दिल्लीत आणि उद्धव ठाकरे मुंबईच्या दिशेने इंजिन ओढत आहेत. सर्व दिशेकडे नेते इंजिन ओढत असल्याने इंजिन एकाच ठिकाणी ठप्प आहे,” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

हेही वाचा :  '...म्हणून आता आम्हाला उत्तम संधी'; ठाकरेंविरुद्ध निकालानंतर पवारांची पहिली प्रतिक्रिया



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …