वडिलांच्या या एका विनंतीमुळे अदनान सामीने तब्बल १३० किलो वजन घटवलं, असा होता डाएट

गायक-संगीतकार अदनान सामी हा वजन कमी करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी व्यक्ती आहे. गायक अदनानचे वजन तब्बल २३० किलो होते. काही वर्षांपूर्वी त्याने वजन कमी करून130 किलो केले आहे. त्याच्यासह प्रत्येकासाठी अतिशय खास गोष्ट आहे.

मॅशेबल इंडियाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान, गायकाने नेमके कोणत्या वळणावर वजन कमी करण्याच्या प्रवासाला सुरुवात केली याबद्दल खुलासा केला. अदनानने सांगितले की, “माझे वजन 230 किलो होते आणि लंडनमधील डॉक्टरांनी मला अल्टिमेटम दिला. त्याने मला सांगितले की, तू ज्या प्रकारे तुझे जीवन जगत आहेस, सहा महिन्यांत तुझ्या पालकांना हॉटेलच्या खोलीत तुझा मृतदेह दिसले तर मला आश्चर्य वाटणार नाही.’ महत्वाची बाब म्हणजे डॉक्टर हे सगळं सांगत असताना अदनानचे वडिल देखील तिथेच गोते.

आपला मुलगा गमावण्याच्या भीतीने, सामीचे वडील त्याच्यासोबत बसले आणि त्यांच्यात ‘अतिशय भावनिक संवाद’ झाला. अदनानने शेअर केले की, त्याच्या वडिलांनी त्याला काय सांगितले, “तुला जे काही सहन करावे लागले ते मी सहन केले आहे. मी जाड आणि बारीक या दोन्ही अवस्थेत मी तुझ्याबरोबर आहे. मी नेहमीच तुझा हात धरला आहे आणि तुझ्याकडे मी कधीच काही मागितले नाही. पण माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्ही मला दफन करा पण मी तुला दफन करू शकत नाही, कोणत्याही पित्याने आपल्या मुलाला दफन करू नये.” (फोटो सौजन्य – iStock)

हेही वाचा :  96.8Kg वजनामुळे दिसू लागली होती हाय बीपी-फॅटी लिव्हरची लक्षणे, ग्रीन टी पिऊन 5 महिन्यात कमी केलं 18Kg वजन

​टर्निंग पॉईंट

या संवादानंतर अदनानने आपल्या वडिलांना वजन कमी करण्याचे ‘वचन’ दिले. “मी टेक्सासला गेलो आणि मला एक विलक्षण व्यक्ती असलेली पोषणतज्ञ मिळाली. त्यानंतरमाझी जीवनशैली पूर्णपणे बदलली आणि तिने मला सांगितले की, मला आयुष्यभर या जीवनशैलीला चिकटून राहावे लागेल,” त्याने शेअर केले.

​कोणतीच सर्जरी नाही

अनेकांना वाटतं की, सामीने सर्जरी करून वजन कमी केले. मात्र कोणतीच सर्जरी न करता फक्त डाएटच्या मदतीने अदनान सामीने वजन कमी केले. लोकांना वाटतं की, लिपोसेक्शन केलं असेल.

​वजन कमी करण्यासाठी काय केलं?

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ‘भर दो ढोली मेरी’ गायकाने त्याच्या आहाराचे रहस्य उघड केले. “मी एक दिनचर्या फॉलो करायचो. ज्यामध्ये मी उच्च-प्रथिने आहाराचे पालन केले ज्यामध्ये भाकरी नाही, भात नाही, साखर नाही, तेल नाही. मला थोडेसे वजन कमी करण्याची आशा होती पण मी 130 किलो वजन कमी केले. मी फक्त डाएट फॉलो केले आणि तसेच घडले. आज, मी काय खातो याबद्दल मी खूप सावध आहे. मी माझे सेवन जास्त करण्याचा प्रयत्न करत नाही. मी मोठ्या प्रमाणात आहारात बदल केला आहे. या बदलामुळे मी खूप आनंदी आहे,” त्याने शेअर केले.

हेही वाचा :  40 वर्षं जुन्या 'त्या' एका चुकीचा आजही शरद पवारांना होतो पश्चाताप, म्हणाले होते "मला कोणी रोखायला..."

(वाचा – मुंबईतील गृहिणीने अगदी घरगुती जेवणाच्या मदतीने ५ महिन्यात तब्बल ४० किलो वजन केलं कमी)

​जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

इतके वजन कमी केल्यानंतर, सामी अजिबातच ओळखता येत नाही. अदनानच्या आधीच्या आणि आताच्या फोटोंनी चाहतांना थक्क केलं आहे. अमेरिकेतील एका इमिग्रेशन अधिकाऱ्याने सामीला थांबवले होते, जो त्याच्या जुन्या पासपोर्ट फोटोप्रमाणेच तो माणूस आहे यावर विश्वास ठेवू शकला नाही.

“मला आठवतं काही वर्षांपूर्वी मी अमेरिकेत प्रवेश करत होतो तेव्हा त्यांना एक समस्या आली होती. मुझे गूगल मै जाके उनको दिखना पडा की देखो, मी तीच व्यक्ती आहे आणि माझ्या वजन कमी करण्याबद्दल हे सर्व लेख आहेत. आणि नंतर जेव्हा त्यांनी आधी आणि नंतर पाहिले तेव्हा त्यांना असे वाटले की तो एकच माणूस आहे,” सामीने बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

(इंग्रजीत हे आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

(वाचा – स्वतःच्या लठ्ठपणाचा बाऊ न करता, मेडिकल स्टुडंटने कमी केलं तब्बल २० किलो वजन))

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …