40 वर्षं जुन्या ‘त्या’ एका चुकीचा आजही शरद पवारांना होतो पश्चाताप, म्हणाले होते “मला कोणी रोखायला…”

Sharad Pawar Oral Cancer: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी राज्याच्या राजकारणात भूकंप आणला आहे. आपलं आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी आपण पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होत असल्याची घोषणा केली आणि एकच गोंधळ उडाला. पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते शरद पवारांना निर्णय मागे घेण्यासाठी मनधरणी करत आहेत. शरद पवार हे महाराष्ट्रातील मोठे नेते असून गेल्या 60 वर्षांपासून राज्याच्या राजकारणात आहेत. सर्वसामान्य कुटुंबातून ते देशाच्या कृषीमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. 

शरद पवारांनी आपल्या 60 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत आमदार, मुख्यमंत्री, केंद्रीय कृषीमंत्री अशी अनेक पदं भूषवली आहेत. तब्बल 56 वर्षांपासून ते सत्तेत राहिले आहे. दरम्यान आपल्या या राजकीय कारकिर्दीत त्यांनी एका गोष्टीचा आजही पश्चाताप होत आहे. एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल बोलूनही दाखवलं होतं. 

शरद पवार यांना तोंडाचा कॅन्सर (Oral Cancer) झाला होता. 2004 मध्ये यामुळे त्यांना सर्जरी करावी लागली होती. या सर्जरीत त्यांना आपले दातही गमवावे लागले होते. 2018 मध्ये इंडियन डेंटल असोसिएशनच्या (IDA) ओरल कॅन्सरवर आधारित विषयावर शरद पवार सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आपण 40 वर्षांपूर्वी केलेल्या एका चुकीबद्दल सांगितलं होतं, ज्यामुळे त्यांना तोंडाचा कॅन्सर झाला होता. शरद पवारांनी सांगतिलं होतं की, 40 वर्षांपूर्वी कोणीतरी मला सुपारी आणि तंबाखू खाण्यापासून रोखायला हवं होतं. 

हेही वाचा :  Pune Bypoll Election : पुण्यातील पोटनिवडणुकीला गालबोट, मतदानादरम्यान जोरदार राडा, Video समोर!

विशेष बाब म्हणजे, त्यावेळी डॉक्टरांनी त्यावेळी शरद पवारांना तुमच्याकडे फक्त सहा महिने शिल्लक आहेत असं सांगितलं होतं. शरद पवारांनी औरंगाबादमध्ये मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यात हे सांगितलं होतं. मुंबईतील रुग्णालयात शरद पवारांवर सर्जरी करण्यात आली होती. 

“डॉक्टरांनी सांगितलं होतं. तुमचं आयुष्य सहा महिने आहे. काही कामं राहिली असतील तर संपवून घ्या. मी म्हणालो लागली पैज. मी काही जात नाही,” असा किस्सा शरद पवारांनी सांगितला होता. 

शरद पवारांनी जाहीर केली निवृत्ती

“मी आता निवडणुकीला उभा राहणार नाही. यापुढे देशाच्या, राज्याच्या प्रश्नात लक्ष घालणार. याशिवाय इतर कोणतीही जबाबदारी घेणार नाही. इतकी वर्षं संधी झाल्यानंतर कुठे तरी थांबायचा विचार केला पाहिजे. जास्त मोह करणं योग्य नाही. मी तशी भूमिका घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल, पण मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय आज घेतला आहे,” अशी घोषणा शरद पवारांनी केली आहे. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …