मनोज जरांगेंनी शेवटचा डाव टाकत सरकारला धरलं वेठीस, मुंबईला निघण्यापूर्वी केली ही घोषणा

Manoj Jarange Mumbai March : मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा वातावरण तापणार आहे अशी चिन्ह दिसत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे त्यांच्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी सरकाला वेठीस धरण्यासाठी मोठी घोषणा केली. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करणार आहेत. मुंबईला निघण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सरकारला वेठीस धरताना त्यांनी आंतरवाली सराटीमधूनच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे सरकारच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. (Manoj Jarange made the announcement before leaving for Mumbai throwing the last innings to hold the government Maratha Reservation)

एकीकडे रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आणि दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेसोबत मराठे मुंबईत आंदोलन करणार असल्याने एकनाथ शिंदे सरकारच्या अडचणीत भर पडली आहे. त्यात मनोज जरांगे यांनी सरकारविरोधात टीका केली आहे.  54 लाख नोंदी आणि 45 वर्षांपासून लढा सुरु आहे.  तरी सरकार इतकं निर्दयीपणे कसं वागू शकतं. ज्या सरकारला मराठ्यांनी गादीवर बसवलं. आज नोंदी मिळालेल्या असताना आरक्षण देऊ शकत नाही? गोरगरीबांची पोरं मरत असताना त्यांना हक्काचं आरक्षण का देत नाही? हा अन्यायाचा कळस झाला आहे. डोळ्यांदेखत आत्महत्या होत आहेत तरीही सरकारला झोप कशी लागते? या शब्दात त्यांनी सरकारवर प्रहार केला आहे. 

हेही वाचा :  बळीराजा सुखावणार! राज्यात पुढील 3 दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अलर्ट

मुंबईत मनोज जरांगे आंदोलन करुन नयेत यासाठी सरकारकडून अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले. अनेकदा सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि मला समजवण्याचा प्रयत्न झाला. बच्च कडूदेखील सरकारकडून जरांगेकडे समजूत काढण्यासाठी गेले होते. मात्र मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे ठाम असून जीव गेला तरी मागे फिरणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. 

मनोज जरांगे यांच्या मुंबईकडे प्रवास ( Manoj Jarange March to Mumbai Complete Schedule)

20 जानेवारी – पहिला दिवस : अंतरवाली ते मातोरी.

अंतरवालीतून पायी-वाहन यात्रेला सुरुवात. अंतरवालीतून सकाळी 9 वाजता निघाले असून कोळगाव ता. गवराई इथे दुपारचं जेवण झाल्यानंतर मातोरी ता. शिरूर इथे मुक्काम 

21 जानेवारी – दुसरा दिवस : मातोरी ते करंजी बाराबाभळी.

मातोरीतून सकाळी 8 वाजता निघणार, तनपुरवाईला आणि पाथर्डी इथे दुपारी विश्रांती, बाराबाभळी-कारंजी बाट ता. नगर इथे मुक्काम 

22 जानेवारी – तिसरा दिवस : बाराबाभळी ते रांजणगाव.

बाराबाभळीतून सकाळी 8 वाजता निघणार, सुपा ता. पारनेरे दुपारी विश्रांती, रांजणगाव ता. शिरूर इथे मुक्काम

23 जानेवारी – चौथा दिवस : रांजणगाव ते चंदन नगर, खराडी बायपास.

रांजणगावातून सकाळी 8 वाजता, कोरेगाव भिमा इथे दुपारी विश्रांती, चंदनगर-खराडी बायपास मुक्काम

हेही वाचा :  Viral Video : भररस्त्यात तरुणीला फरफटत गाडीतून किडनॅप केलं की...? अखेर सत्य समोर

24 जानेवारी – दिवस पाचवा : खराडी बायपास ते लोणावळा.

चंदन नगर, खराडी बायपास येथून सकाळी 8 वाजता निघणार, तळेगाव दाभाडे इथे दुपारी विश्रांती, लोणावळा इथे मुक्काम

25 जानेवारी – दिवस सहावा : लोणावळा ते वाशी

लोणावळाहून सकाळी 8 वाजता निघणार, पनवेल ता, नवी मुंबई इथे दुपारी विश्रांती, वाशी इथे मुक्काम

26 जानेवारी – दिवस सातवा: वाशी ते आझाद मैदान-मुंबई

वाशीतून सकाळी 8 वाजता निघणार, मुंबईतील परवानगी मिळालेल्या मैदानात उपोषणाला बसणार



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

‘हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..’; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम …