हत्तीशी मैत्री करण्याचा प्रयत्न तरुणीला पडला महागात, सोंडेने खाली पाडलं अन् नंतर…; पाहा VIDEO

माणसाला त्याचा आवडते प्राणी विचारलं तर त्यात हत्तीचा उल्लेख नक्की केला जातो. याचं कारण हत्ती हा माणसाचा मित्र म्हणूनच पाहिला गेला आहे. जर हत्तीला प्रेमाने वागवलं तर तो माणसावर नितांत प्रेम करतो हे अनेकदा सिद्ध झालं आहे. पण जर त्याला त्रास दिला तर त्याच्याइतका वाईट प्राणी नाही हेदेखील तितकंच खरं आहे. सोशल मीडियावर हत्तीचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा यामध्ये हत्ती जंगलात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा पाठलाग करताना दिसतो. तर काहीजण विनाकारण हत्तीच्या जवळ जाण्याचं धाडस करत असतात. दरम्यान, असं धाडस करणं एका तरुणीला महागात पडलं असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हत्तीच्या जवळ गेल्यावर तो हल्ला करु शकतो याची कल्पना असतानाही काहीजण त्याच्याजवळ जाऊन फोटो, व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करत असतात. एका तरुणीने अशाच प्रकारे हत्तीच्या जवळ जाऊन त्याच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी तिला आयुष्यभराचा धडा मिळाला आहे. यानंतर ती पुन्हा कधी असलं धाडस करणार नाही. 

व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, तरुणी हत्तीशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहे. हत्ती खाण्यात व्यग्र असताना तरुणी त्याच्या शेजारी जाऊन उभी राहते. यावेळी ती कॅमेऱ्यात हे क्षण कैद करण्याचा प्रयत्न करत असते. पण पुढच्याच क्षणी चिडलेला हत्ती सोंडेने तरुणीला खाली पाडतो. अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्याने घाबरलेली तरुणी जमिनीवर कोसळते. यानंतर ती सर्वात आधी तेथून पळ काढते. 

हेही वाचा :  Income Tax : वॉचमनचा पगार फक्त 10 हजार; इन्कम टॅक्सने पाठवली 1 कोटी 14 लाखांची नोटीस

Non-aesthetic things या एक्स अकाऊंटला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘तरुणी हत्तीशी मैत्री करण्याचा प्रयत्न करते आणि अखेर समजलं,’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेक नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या असून त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. एका युजरने लिहिलं आहे की, “तिच्या नशिबाने हत्तीच्या पिलाने तिला मोठा हत्ती येण्याआधी घाबरवून दूर पाठवलं”. तर एकाने जंगली प्राण्यांना एकटं सोडा असा सल्ला दिला आहे. 

“शेपूट हालत असताना हत्तीच्या जवळ जाऊ नका. त्याला धोका वाटत असतो,” असं एकाने म्हटलं आहे. 

केरळमध्ये गेल्या तीन आठवड्यांत हत्तींच्या हल्ल्यात तीन लोकांचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांना शेकडो नवीन कॅमेरे आणि गस्त या समस्येचा सामना करण्यात मदत करतील अशी आशा आहे. नुकतंच जंगली भागात वायनाड प्रदेशातील पुलपल्ली शहरात शुक्रवारी 52 वर्षीय टुरिस्ट गाईडवर हत्तींच्या कळपाने प्राणघातक हल्ला केल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं होतं. 

हेही वाचा :  viral video: पुण्यात घडलंय - बिघडंलय... बटाटे पाहण्यासाठी लोकं का करतायेत गर्दी? जाणून घ्या



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …