SBI-HDFC-ICICI बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी नवीन नियम, RBIकडून नवा आदेश जारी

Reserve Bank of India KYC Rules: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) KYC बाबत बँकांसाठी नवीन आदेश जारी केला आहे. आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले की, जर तुम्ही एकदा केवायसी केले असेल तर तुम्हाला पुन्हा केवायसी करण्यासाठी पुन्हा शाखेत जाण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांची सेल्‍फ ड‍िक्‍लेरेशन पुरेशी ठरेल, असे केंद्रीय बँकेच्यावतीने सांगण्यात आले. तसेच खातेदारांना नव्या नियमानुसार त्यांचा पत्ताही अपडेट करता येणे शक्य आहे.

बँकांकडून दोन महिन्यांत होईल पडताळणी  

आरबीआयने (RBI) बँकांना बजावले आहे की, ग्राहकाच्या Re-KYC साठी ग्राहकांना बँकेत जाणे आवश्यक नाही. या स्थितीत खातेदाराला ईमेल-आयडी, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, एटीएम, डिजिटल चॅनलद्वारे केवायसीची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. आरबीआयच्यावतीने असे सांगण्यात आले की, जर ग्राहकांच्या पत्त्यात बदल झाला असेल तर ग्राहक आपला अपडेट केलेला पत्ता कोणत्याही माध्यमातून बँकेत देऊ शकतो. यानंतर दोन महिन्यांत बँकेने घोषित केलेल्या पत्त्याची पडताळणी केली जाईल.

काही प्रकरणांमध्ये केवायसी प्रक्रिया पुन्हा करावी लागेल

रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, बँकांना वेळोवेळी त्यांचे रेकॉर्ड अपडेट करणे आवश्यक आहे. त्यामुळे, काही प्रकरणांमध्ये, केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरु करावी लागेल. हे केवळ ज्या कागदपत्रांची यादी उपलब्ध नसेल त्यांना पुन्हा केवायसी करावी लागेल. किंवा KYC साठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची वैधता संपलेली असते. अशा प्रकरणांमध्ये बँकेला ग्राहकाने तयार केलेली केवायसी कागदपत्रे घेणे आवश्यक आहे. अशीवेळी ग्राहकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.

हेही वाचा :  Ajit Pawar : उद्धव ठाकरेंसमोर रडला असतात तर... सुषमा अंधारेंना अजित पवारांनी सुनावलं

या आहेत सुरक्षित बँका 

Reserve Bank of India: रिझर्व बँकेकडून (Reserve Bank Of India) बॅंकांबाबत एक यादी जाहीर करण्यात आली आहे. आरबीआयने (RBI) जारी केलेल्या यादीत स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणत्या बँकेत तुमचे पैसे सुरक्षित आहेत (India’s Safest Bank) आणि कोणत्या बॅकेत पैसे सुरक्षित नाही, याची यादी जाहीर करण्यात आली आहे. देशातील कोणत्याही बँकेत आर्थिक नुकसान होत असेल तर ग्राहकांसह देशातील सर्व बँकेचे नुकसान होऊ शकते, अशी माहिती आरबीआयकडून देण्यात आली आहे. आरबीआईने दिलेल्या माहितीनुसार बॅंक ऑफ इंडियासह खासगी बँकेपैकी HDFC Bank आणि ICICI Bank यांचीही नावे यादीत आहेत.

वर्ष 2015 पासून, रिझर्व्ह बँक अशा बँकांची यादी जारी करते ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सर्वात महत्वाच्या आहेत आणि RBI त्यांच्यावर लक्ष ठेवून असते. बँकांना आरबीआयकडून रेटिंगही दिले जाते, त्यानंतरच या महत्त्वाच्या बँकांची यादी जाहीर केली जाते. सध्या या यादीत तीन बँकांची नावे आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …