अंबानींच्या कार्यक्रमात सलमानची ‘या’ तरुणीसोबत हजेरी

Radhika Merchant : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) हा राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नगाठ बांधणार आहे.  गुरुवारी (19 जानेवारी) राधिका आणि अनंत यांचा साखरपुडा पार पडला. राधिका आणि अनंत यांच्या साखरपुड्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा देखील या सोहळ्यात उपस्थित होता. यावेळी या सोहळ्यालावा सलमानने एका तरुणीसोबत एन्ट्री केली. ही तरुणी कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याला सलमानने त्याची बहीण अलविरा खान अग्निहोत्रीची मुलगी अलिझेह खान अग्निहोत्रीसोबत हजेरी लावली. यावेळी सलमानची भाची अलिझेह खान अग्निहोत्रीने अनेकांचे लक्ष वेधले. अलिझेह ही 23 वर्षांची आहे. ती सलमानची मोठी बहिण अलवीरा आणि अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. अलिझेहची आई अलवीरा ही फॅशन डिझायनर आहे.

सलमान आणि अलिझेहचा लूक

सलमानाने अनंत आणि राधिका यांच्या साखरपुड्याला ब्लू सिल्क कुर्ता आणि ब्लॅक शूज अशा लूकमध्ये दिसत होता. तर त्याची भाची अलिझेह ही व्हाईट लेहंगा आणि हातात व्हाईट बॅश अशा लूकमध्ये दिसली. 


 

हेही वाचा :  फक्त ८०० रुपये कमावणाऱ्या नीता अंबानींसमोर धीरूभाईनी ठेवली 'ही' अट, मग मुकेश अंबानींच्या होकारावर झालं लग्न

अँटिलियामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा

मुंबईतील अँटिलिया बंगल्यामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा पार पडला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा रोका 29 डिसेंबर 2022 रोजी राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरामध्ये झाला होता. यानंतर अंबानी कुटुंबाने मुंबईत एंगेजमेंट पार्टीही आयोजित केली होती. लवकरच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे लग्नबंधनात अडकणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Salman Khan: ‘मुलं पाहिजेत पण त्यांची आई नको’ सलमान खान असं का म्हणाला?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …