Bank Customer : बँकेबाबत काही तक्रारी असतील तर येथे करु शकता, 30 दिवसांच्या आत निराकरण !

Reserve Bank Ombudsman Scheme : बँकेत तुमचे काम होत नसेल किंवा कामाबाबत वेगवगळी कारणे सांगितली जात असतील तर आता तुम्हाला थेट तक्रार करता येणार आहे. ( Bank customer ) भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबत एकात्मिक लोकपाल योजना (Reserve Bank Ombudsman Scheme) सुरु केली आहे. त्यामुळे बँकेकडून आता तुमची अडवणूक होणार नाही.

रिझर्व्ह बँकेची एकात्मिक लोकपाल योजना

अनेक वेळा आपण बँकेत जातो. बऱ्याचवेळा सरकारी बँकेत धड उत्तरं मिळत नाहीत. बँकेत गेल्यावर अनेकांना व्यवहार तसेच बँकेविषयी कामांची माहिती नसते. त्यामुळे तुम्ही एखाद्याबाबत चौकशी केली तर तुम्हाला नीट उत्तर मिळत नाही. अशावेळी तुम्हचा त्रागा होतो. कशाला बँकेत आलो, असे वाटते. आता तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर तुम्ही थेट तक्रार करु शकता. (Bank customer complaint)

30 दिवसांच्या आत तक्रारींचे निवारण 

आरबीआयने (RBI) विनियमित संस्थांच्या विरुद्ध तक्रारींच्या निवरणासाठी एकल सुविधा सुरु केली आहे. 30 दिवसांच्या आत तक्रारींचे निवारण न झाल्यास किंवा आरबीआय द्वारा विनियमित बँका, एनीएफसी, प्रणाली भागिदरांच्याद्वारा समाधानकारक निवारण न झाल्यास तुम्ही त्यांची तक्रार लोकपालांकडे (ऑम्बड्सम्रन) दाखल करु शकता. त्यामुळे तुम्हाला आता त्रागा किंवा त्रास सहन करावा लागणार नाही.

हेही वाचा :  सातारा जिल्ह्यातील 'या' गावात डोंगराला मोठ्या भेगा पडल्या; ग्रामस्थ भयभित

या ठिकाणी तक्रार करु शकता

अपवर्जन सूचीतील तक्रारींच्या व्यतिरिक्त सेवांमधील कमतरतांच्या संबंधातील सर्व तक्रारींचा एकात्मिक लोकपाल योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही आता तक्रारी ऑनलाईन https://cms.rbi.org.in येथे किंवा पोस्टाने केंद्रीकृत पावती प्रसंस्करण केंद्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, चंदीगढ -160017 येथे दाखल करु शकता. तशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केले आहे. त्यानुसार एकात्मिक लोकपाल योजना लागू करण्यात आली आहे.

तुमच्या तक्रारीची सद्धस्थिती तक्रार व्यवस्थापन प्रणाली https://cms.rbi.org.in वर तुम्ही बघू शकता. ग्राहकांच्या सेवेसाठी RBIने सार्वजनिक हितार्थ जारी करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार ही माहिती देण्यात आली आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) म्हटलेय, तुम्ही जाणकार बना आणि सतर्क राहा.

विनियमित घटकाचे प्रतिनिधित्व करणे आणि ग्राहकांनी नियमन केलेल्या घटकाविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारींच्या संदर्भात माहिती देण्याची जबाबदारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकेतील महाव्यवस्थापक किंवा समकक्ष पदावरील प्रधान नोडल अधिकाऱ्याची असणार आहे. तसेच या एकात्मिक लोकपाल योजनेची प्रत आरबीआयच्या वेबसाइटवर आणि CMS पोर्टलवर (https://cms.rbi.org.in) उपलब्ध आहे.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School …

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …